शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: गोंधळ घालणाऱ्या खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा- रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 19:34 IST

Ramdas Athawale: पेगॅसस प्रकरणावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मोदी सरकारची बाजू मांडताना विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.

Ramdas Athawale: पेगॅसस प्रकरणावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मोदी सरकारची बाजू मांडताना विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. "केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. पेगॅसिसबाबतचा केंद्रावर होत असलेला आरोप बिनबुडाचा आहे", असं रामदास आठवले संसदेत म्हणाले. यासोबतच संसदेत गोंधळ घालून काम न होऊ देणाऱ्या खासदारांचं दोन वर्षांचं निलंबन करण्याचा नियमच सरकारनं बनवला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

"केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घातल आहेत. त्यामुळे सलग ३ दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशी देखील खासदार आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करुन कामकाज रोखण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियमच सरकारनं बनवला पाहिजे", असं रामदास आठवले म्हणाले. 

"कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी. त्यासाठीच अधिवेशनांचं आयोजन केलं जातं. एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हायला हवं. पण विरोधासाठी संसदेचं कामकाज रोखून धरणं कितपत योग्य आहे? त्यामुळे संसदेचा वेळ वाया जातो. यानं देशाचं नुकसान होत आहे. सलग तीन दिवसांपासून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत आणि चौथ्या दिवशी देखील त्यांनी असंच केलं तर गोंधळ घालणाऱ्या खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करा, मग तो सत्ताधारी पक्षाचा असो किंवा मग विरोधी बाकावरचा सर्वांसाठी नियम तयार करा", अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली. 

२०२४ मध्येही मोदीच"आगामी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत 'खेळा' नाही, तर मोदींच्या समर्थनाचा 'मेळा' होणार आहे. २०२४ साली मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार निवडून येईल", असं म्हणत रामदास आठवले यांनी ममता बॅनर्जींनाही टोला लगावला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणाचंच आव्हान नाही, असंही रामदास आठवले म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदी