शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

मोदींवर टीका केल्याने रामचंद्र गुहा यांना धमक्या

By admin | Updated: March 29, 2017 13:20 IST

मोदी आणि भाजपावर टीका केल्यास आता दैवी शक्ती तुम्हाला शिक्षा देतील अशा धमक्या ईमेलद्वारे देण्यात येत असल्याचं रामचंद गुहा बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने आपल्याला धमक्या देणारे ई-मेल येत असल्याचं इतिहास संशोधक आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी सांगितलं आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. मोदी आणि भाजपावर टीका केल्यास आता दैवी शक्ती तुम्हाला शिक्षा देतील अशा धमक्या ईमेलद्वारे देण्यात येत असल्याचं रामचंद गुहा बोलले आहेत.
 
58 वर्षीय रामचंद्र गुहा यांची अनेक पुस्तकं लोकप्रिय असून महात्मा गांधी यांच्यासंबंधी त्यांचं लिखाण वाचकांच्या पसंतीस उतरलं आहे. रामचंद्र गुहा यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका न करण्याची धमकी मिळाली आहे. 
 
रामचंद गुहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे की, 'गेल्या काही दिवसांपासून मला धमक्यांचे मेल येत आहेत. भाजपावर टीका करत असल्याने दैवी शक्तीच्या शिक्षेसाठी तयार राहा'. रामचंद्र गुहा यांनी अजून एक ट्विट केलं असून 'मला भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची जग बदलण्यासाठी दैवी शक्तीने निवड केली आहे त्यांच्यावरही टीका न करण्याची धमकी मिळाली असल्याचं', सांगितलं आहे.
 
मेल पाठवणा-यांनी स्वत:ला दैवी भारतीय म्हटलं असून गुहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची इंदिरा गांधींसोबत आणि अमित शहा यांची संजय गांधींसोबत तुलना न करण्याचीही धमकी दिली आहे. 
 
मात्र रामचंद्र गुहा यांनी अशा धमक्या येणं माझ्यासाठी नियमित असून याला गंभीरतेने गरज घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. मात्र रामचंद्र गुहा यांनी धमकी देणा-यांची नावे जाहीर केलेली नाहीत. 
 
कोण आहेत रामचंद्र गुहा - 
रामचंद्र गुहा एक प्रसिद्ध इतिहास संशोधक आहेत. नुकतेचं सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या प्रशासकांची नियुक्ती केली असून रामचंद्र गुहा यांचाही यात समावेश आहे. रामचंद्र गुहा यांना क्रिकेटचीही तितकीच आवड असून प्रथम श्रेणी क्रिकेटबद्द्ल त्यांना दांडगी माहिती आहे. या विषयावर देश - विदेशातील अनेक महत्वाच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिखाण केलं आहे. आपल्या सामाजिक आणि राजकीय लिखाणासाठीही रामचंद्र गुहा यांना ओळखलं जातं. . 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'इंडिया आफ्टर गांधी' हे त्यांचं जास्त चर्चा केलं गेलेलं लिखाण. ‘इंडिया आफ्टर गांधी’, ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’, ‘पॅट्रियटस् अ‍ॅण्ड पार्टिज्न्स’ आदी पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. अनेकदा आपलं मत ते ट्विटरच्या माध्यमातूनच मांडत असतात.