रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे २५१ रामभक्तांचा गौरव
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
अकोला- रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने २५१ रामभक्तांचा गौरव शनिवारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. समितीतर्फे राणी सतीधाम येथे आयोजित कार्यक्रमात रामप्रतिमा आणि भेटवस्तू देऊन भक्तांना गौरविण्यात आले. रामनवमी शोभायात्रा काढण्यास मदत करणार्या भाविकांना दरवर्षी समितीतर्फे गौरविण्यात येते. हा समारंभ आ. शर्मा यांच्यासह आ. गोपीकिशन बाजोरिया, दायमा महाराज, मसने महाराज, वाघ महाराज, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, काका जोशी, ब्रिजमोहन चितलांगे आदींच्या उपस्थित झाला. संचालन गिरीश जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)