शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चित्रविचित्र क्रमांकांच्या दुचाकींवर कारवाई रामानंद नगर पोलिसांची कारवाई : मद्यपी व भरधाव वेगाने चालविणार्‍यांवरही दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 00:16 IST

जळगाव: रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने वाहने चालविणे, दारू पिऊन दुचाकी चालविणे तसेच चित्रविचित्र क्रमांक आदी प्रकारच्या दुचाकीस्वारांवर रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री काव्यरत्नावली चौकात कारवाई केली. अचानक कारवाईची मोहीम राबविल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, उपनिरीक्षक दिलीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी व शरद पाटील आदींनी रात्री एक वाजेपर्यंत ही मोहीम राबविली. यावेळी पोलीस अधीक्षकांच्या पथकाचीही मदत घेण्यात आली.

जळगाव: रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने वाहने चालविणे, दारू पिऊन दुचाकी चालविणे तसेच चित्रविचित्र क्रमांक आदी प्रकारच्या दुचाकीस्वारांवर रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री काव्यरत्नावली चौकात कारवाई केली. अचानक कारवाईची मोहीम राबविल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, उपनिरीक्षक दिलीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी व शरद पाटील आदींनी रात्री एक वाजेपर्यंत ही मोहीम राबविली. यावेळी पोलीस अधीक्षकांच्या पथकाचीही मदत घेण्यात आली.
यांच्यावर केली कारवाई
दारू पिऊन दुचाकी चालविणार्‍या घनश्याम दत्तात्रय सोनार (क्र.एम.एच.१९ सी.बी.०२५०) व आशीषकुमार प्रीतमसिंग (एम.एच.१९.सी.बी.०६२०) या दोघांवर मोटार वाहन कायद्यान्वये दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. परिवहन नियमांचे उल्लंघन करणार्‍या पंकज चंदुलाल केंगरानी (क्र.एम.एच.१९ ए.व्ही.००११), योगेश राजीव भावसार (क्र.एम.एच.१९ जी.डी.३८९) व गोरख मेहता (क्र.एम.एच.१९ सी.के.२२४७) यांना प्रत्येकी तीनशे रुपये दंड ठोठावण्यात आला. तर पियूष अभय पाटील या तरुणाच्या दुचाकीला पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला. या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शनिवारी दंड भरून त्या सोडण्यात आल्या.
कारवाई सुरूच राहणार
सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये महागड्या दुचाकींचाच वापर झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दुचाकीधारकांवर कारवाईची मोहीम उघडण्यात आली असून त्यात सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक वाडीले यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी दारू पिऊन भरधाव वेगाने वाहने चालविण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी वाहतूक शाखा व रामानंद नगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.