रमजान विशेष (संडे स्पेशल) १
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
धार्मिक पुस्तकांना मागणी
रमजान विशेष (संडे स्पेशल) १
धार्मिक पुस्तकांना मागणीरमजानच्या निमित्ताने धार्मिक पुस्तकांची मागणी तितकीच वाढली असल्याचे मुमताज हुसेन एम. चौधरी यांनी सांगितले. हिंदी, अरबी, इंग्रजी, मराठी कुरआन, कुरआनचे ३० पार्यांचे सेट, हदीस बुखारी शरीफ, तफसीर, तफसीर इब्ने कसीर आदींची विक्री या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होते. कुरआनमधील ३० अध्याय यांचे स्वतंत्र पुस्तक उपलब्ध आहे. ४०० ते १५०० रुपयांपर्यंत याची किंमत आहे. कुरआनचा विविध भाषांमधील अनुवादही लोक मोठ्या प्रमाणावर वाचतात. त्याशिवाय प्रार्थनेसंदर्भातील पुस्तकेही उपलब्ध आहेत. डीलक्स स्वरूपाचे कुरआनही बाजारात आले आहे. वाचताना कुरआन ठेवण्यासाठी रिहालही विक्रीस वापरले जाते. ६५ रुपये ते १२५ रुपयांपर्यंत याची किंमत आहे. धार्मिक पुस्तके भेट देण्यासाठी, मदरसा, मस्जिदमध्ये वाचण्यासाठीही नेली जातात. लग्नात आपल्या मुलीला कुरआन भेट देण्याचीही प्रथा आहे. हिंदी भाषेतील कुरआन ५५० रुपयांपर्यंत, अरबी भाषेतील कुरआन ५५० रुपयांपर्यंत तर इंग्रजी भाषेतील कुरआन ४०० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. नमाजसाठी जाए नमाजचीही या महिन्यात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. चिनी, वेल्वेट, कटवर्क आदी स्वरूपाच्या जाए नमाज ठिकठिकाणी विक्रीस आल्या आहेत. सुमारे १०० ते ५०० रुपयांपर्यंत याची विक्री केली जाते. सध्या अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या जाए नमाज विक्रीस आल्या आहेत.सुरमा आणि अत्तरला मोठ्या प्रमाणात मागणीरमजानच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात घालण्यात येणारा सुरमा आणि कपड्यांना लावण्यात येणार्या अत्तराला मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. विजापूर वेस येथे मीना बाजारात अशी विविध स्वरूपाची दुकाने रस्त्यावर दिसून येतात. साधा सुरमा, कडवा सुरमा, खोजादी डीलक्स सुरमा, ममीरा, लाल कलर, हिरवा कलर, निळा कलर अशा प्रकारचे सुरमा बाजारात आले आहेत. डोळ्याला थंडपणा देण्यासाठी, डोळ्यांची निगा राखण्यासाठी अशा सुरमांचा वापर करण्यात येतो. सुरम्याची किंमत १० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत आहे. सुरमा हा विविध धर्मातही लावला जात असल्याने त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.कपड्याला लावण्यासाठी अत्तरही बाजारात विक्रीस आले आहे. हजरे असवत, जमजम, डव, आईसबर्ग, स्प्राईट, मॅग्नेट, पीएम-धूम, फिरदोस यासह केसर संदल, रसासी, अन्फर, हरमेल, करमाला, ब्ल्यू जीन, दानिश, रोमान्स, कॉलर, एसबीएस, आरएस यांचाही समावेश आहे. खास विदेशातून मागविण्यात आलेले अनेक प्रकारचे अत्तर बाजारात विक्रीस आले आहे. उद अत्तर हे महाग असे समजले जाते. याची किंमत ६०० रुपये तोळा इतकी आहे. सुमारे १०० ते ३०० रुपयांपर्यंतचे अत्तर बाजारात विक्रीस आले आहेत. रमजान ईदच्या दिवशी अत्तर लावूनच नमाजला जात असल्याने अत्तराला नेहमीच मागणी असते.शेवयांनी बाजार बहरलारमजान ईदच्या दिवशी वापरण्यात येणार्या शेवया मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्या आहेत. दोनशे रुपये किलो भाव असणार्या सत्तरफेणी शेवयांना बाजारात मागणी आहे. खास अहमदाबाद येथून ही सत्तरफेणी मागविण्यात आल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. सहेरीच्या वेळीही याचा वापर केला जातो. दुधात ही सत्तरफेणी मिसळून दिली जाते. रमजान आणि दिवाळीतच याची अधिक करून मागणी होते. पांढर्या आणि लाल रंगात सध्या ही विक्रीस आली आहे. शिवाय सुट्या प्रमाणातही याची विक्री सुरू आहे. समोशांची विक्री वाढलीरमजान महिन्यात इफ्तारला म्हणजे रोजा सोडताना समोसे मोठ्या प्रमाणावर विकले जातात. कांदा घातलेले समोसे आणि खिम्याचे समोसे असे याचे प्रकार आहेत. कांदा असणारे समोसे ५० रुपये किलोने विकले जातात. तर खिम्याचे समोसे ६० रुपये किलोने विकले जातात. शहरात रोज १० हजारांहून अधिक समोसे विक्रीस जातात.