शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव रमजान ईद :

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

अहमदनगर : रमजानच्या महिन्यात महिनाभर उपवास करुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्याची रक्कम गरजवंतांच्या घरी नेऊन दिली जाते़ तसेच जकात आकारुन मुस्लीम समाजातील वंचितांसाठी विविध खर्च करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे़ ईदच्या नमाजानंतर मोठ्या व्यक्तींकडून लहानांना ईदी दिली जाते़ तसेच वंचितांसाठी विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची परंपरा मुस्लीम बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे़

अहमदनगर : रमजानच्या महिन्यात महिनाभर उपवास करुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्याची रक्कम गरजवंतांच्या घरी नेऊन दिली जाते़ तसेच जकात आकारुन मुस्लीम समाजातील वंचितांसाठी विविध खर्च करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे़ ईदच्या नमाजानंतर मोठ्या व्यक्तींकडून लहानांना ईदी दिली जाते़ तसेच वंचितांसाठी विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची परंपरा मुस्लीम बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे़
याबाबत माहिती देताना डॉ़ इक्राम खान म्हणाले की, रमजान ईदचे मूळ नाव ईद-उल-फित्र हे आहे़ सदका-ए- फित्र या दानापासून हे नाव तयार झाले आहे़ सदका-ए- फित्र म्हणजे ईदच्या नमाजापूर्वी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्या धान्याची रक्कम गरजवंतांना त्यांच्या घरी नेऊन द्यावी़ रमजान महिन्यात महिनाभर उपवास (रोजे) केले जातात़ या महिन्यात जकात कर आकारला जातो़ एकूण उत्पन्नाच्या रकमेतून ५२़५ तोळे चांदी किंवा ७़५ तोळे सोन्याचे दागिने यापेक्षा जास्त असणार्‍या रकमेवर २़५ टक्के रक्कम वंचितासाठी खर्च करणे आवश्यक असते़ यालाच जकात असे संबोधले जाते़ गेल्या वर्षी नगरमध्ये २२ कोटीपेक्षा जास्त जकात जमा झाली होती़ ही रक्कम समाजातील वंचित घटकांसाठी खर्च केली जाते़ कुणी भुकेला राहू नये, कुणी असंतुष्ट असू नये यासाठी या रकमेतून विविध वस्तू खरेदी करुन दिल्या जातात़ वंचितांच्या जीवनात आनंद यावा, यासाठी त्यांना त्यांच्या घरी नेऊन दान द्यायचे असते़ वंचितांना आपल्या आनंदात सामावून घेण्याचा हा सण आहे़
रमजाननंतर येणार्‍या ईदला मोबदल्याचा दिवस म्हणतात़ महिनाभरातील उपवास, काम, दान पाहून प्रत्येकाला मोबदला दिला जातो़ रमजान महिन्यात दिवसभरात पाच नमाज केल्या जातात़ तर ईदच्या दिवशी सहा नमाज करण्याची प्रथा आहे़ नमाज झाल्यानंतर एकमेकांच्या गळाभेटी घेऊन ज्यांच्या घरी कुणी मयत झाले असेल त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले जाते़ त्यांना खाऊ घातले जाते आणि मग स्वत:च्या घरी जाण्याची परंपरा ईदच्या दिवशी आहे़ रमजान हा निव्वळ आनंद साजरा करण्याचा महिना नाही, तर तो इतरांचे दु:ख हलके करण्याचाही महिना आहे़
ईद साजरी करण्याच्या प्रथा जगभर वेगवेगळ्या आहेत़ भारतात दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात़
(जोड आहे)