शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर वादग्रस्त विधान, भाजपा आमदाराविरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: April 10, 2017 14:33 IST

जर कोणी राम मंदिर बांधण्याचा विरोध केला तर त्याचा शिरच्छेद करू असं विधान कऱणा-रे भाजपा आमदार राजा सिंगविरोधात गुन्हा

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 10 - अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यावरून वादग्रस्त विधान करणारे भाजपाचे आमदार राजा सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर कोणी राम मंदिर बांधण्याचा विरोध केला तर त्याचा शिरच्छेद करू असं ते म्हणाले होते. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
 
मजलिस बचाओ तेहरीक या स्थानिक संघटनेचे अध्यक्ष अमजेद उल्लाह यांच्या तक्ररीवरून हैदराबाद पोलिसांनी राजा सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिथावणीखोर आणि धार्मिक भावना भडकावणारं विधान केल्याबद्दल आयपीसी 295A नुसार त्यांच्यावर डाबिरपूरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
"राम मंदिर बांधल्यास गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल असं म्हणणा-यांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या अशाच विधानाची वाट पाहत होतो, जेणेकरून आम्ही तुमचा शिरच्छेद करू शकतो" असं ते म्हणाले होते.
 
यापुर्वीही राजा सिंग यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. राजा यांनी मध्यंतरी फेसबुकवर व्हिडीओ टाकून दलितांना मारहाण करण्याचं समर्थन केलं होतं. जे दलित गोमांस खातात आणि गायींची हत्या करताता त्यांना अशाच प्रकारे मारहाण केली जावी असं ते म्हणाले होते.  
 
राम मंदिर प्रकरण-
 
6 डिसेंबर1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. अजून या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिलेला नाही.  याप्रकरणी न्यायालयाबाहेर तोडगा काढावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता तसेच याप्रकरणी मध्यस्ती करण्याची तयारीदेखील सर्वोच्च न्यायालयाने दाखवली. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 14 जणांवर खटला सुरु आहे.  राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.