शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदराव आदिकांना सर्वपक्षीय श्रध्दांजली राम शिंदे : भल्याभल्यांना जमले नाही ते आदिकांनी केले

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

अहमदनगर : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते आणि जिल्‘ाचे सुपुत्र दिवंगत गोविंदराव आदिक यांना गुरूवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या श्रध्दांजली सभेत अनेक वक्त्यांनी आदिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनी भल्याभल्या राजकारण्यांना जे जमले नाही, ते गोविंदराव आदिक यांनी करून दाखविले असल्याचे गौरवोद्गार काढले.

अहमदनगर : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते आणि जिल्ह्याचे सुपुत्र दिवंगत गोविंदराव आदिक यांना गुरूवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या श्रध्दांजली सभेत अनेक वक्त्यांनी आदिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनी भल्याभल्या राजकारण्यांना जे जमले नाही, ते गोविंदराव आदिक यांनी करून दाखविले असल्याचे गौरवोद्गार काढले.
येथील सहकार सभागृहात या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शिंदे होते. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यासह आ. भाऊसाहेब कांबळे, आ. सुधीर तांबे, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. बाळासाहेब मुरकु टे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह माजी आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्ष नेते विखे यांनी आदिक यांनी नगर जिल्ह्याची ओळख राज्याला आणि देशाला करून दिली. राजकीय धु्रवीकरणात त्यांनी कधीच व्यक्त राजकारण केले नाही. शेतीला बारामाही पाणी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातून श्रीरामपूरचा विकास झाला. मुळा प्रवरा संस्थेत त्यांचा मोठा वाटा होता. सर्वक्षेत्रातील उपेक्षितांना त्यांनी सोबत घेतले. कुशाग्र बुध्दी, कुशल संघटक असणारा तारा निखळला असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री शिंदे यांनी देशाच्या, राज्याच्या राजकारणात आदिक यांचा ठसा होता. कृषक, कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडवले. नगर जिल्हा क्रांतिकारक आहे. जो तो आपला गड सांभाळण्यात अडकलेला असतांना त्यांनी आपला मतदारसंघ सोडून वैजापूर मतदारसंघातून विजय संपादन केला होता. याचा जिल्ह्यातील राजकारण्यांनी बोध घ्यावा. आपल्या मतदारसंघा पलिकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवण्यास त्यांनी सांगितले.
यावेळी बबनराव पाचपुते, आ. शिवाजी कर्डिले, आ. कांबळे, आ. तांबे, आ. राजळे,आ. मुरकुटे, आ. जगताप,जयंत ससाणे, अण्णासाहेब म्हस्के, प्रेमानंद रुपवते, शिवाजी नागवडे, रामनाथ वाघ, नरेंद्र घुले, डी. आर. पाटील, ॲड. अभय आगरकर, पांडुरंग अभंग, अशोक शिंगवी, वसंतराव देशमुख, दादा कळमकर,जि.प. अध्यक्षा गुंड, जिल्हा बँक अध्यक्ष गायकर, महापौर कळमकर, विनायक देशमुख, डी. एम. कांबळे आदींची भाषणे झाली.
................
विखे यांनी आदिक यांचे सुपुत्र अविनाश यांच्यापुढे गोविंदराव आदिक यांचे संघटनांचे कार्य पुढे चालवण्याचे आव्हान आहे. अविनाश हे काम समर्थपणे पेलतील, असा विश्वास व्यक्त केला.