शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

जलिकट्टूचं समर्थन करणा-यांच्या अंगावर 10 वळू सोडा- रामगोपाल वर्मा

By admin | Updated: January 22, 2017 19:52 IST

वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणा-या रामगोपाल वर्मांनी ट्विटरवरून नवे ट्विट करून वाद ओढवून घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 22 - वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणा-या रामगोपाल वर्मांनी ट्विटरवरून नवे ट्विट करून वाद ओढवून घेतला आहे. ट्विटरच्या माध्यमातून तामिळनाडूतील जलिकट्टूला विरोध दर्शवला आहे. जलिकट्टूचं समर्थन करणा-या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर कमीत कमी 10 वळू सोडले पाहिजेत. जेणेकरून त्यांना समजेल की हजारो लोक जेव्हा त्याला पळवतात तेव्हा त्या वळूला कसे वाटत असेल, असे ते म्हणाले आहेत.इतकेच नव्हे तर राम गोपाल वर्मांनी जलिकट्टूच्या आयोजनाची बाजू घेणा-या चित्रपट निर्मात्यांवरही निशाणा साधला आहे. सेलिब्रिटीसुद्धा व्होट आणि तिकीट मिळवण्यासाठीच जलिकट्टूचं समर्थन करत आहेत. तसेच अभिनेते कमल हसन यांनी जलिकट्टूला समर्थन देत विद्यार्थी अहिंसक मार्गानं आंदोलन करत असल्याचं सांगत त्यांचं समर्थन करून त्यांना प्रोत्साहित केल्याचं म्हटलं आहे.(केजरीवाल दीपिकापेक्षाही हॉट दिसतात - रामगोपाल वर्मा)(अंगुरलता सारख्या आमदारामुळे 'अच्छे दिन' आलेच समजा - रामगोपाल वर्मा)रामगोपाल वर्मा म्हणाले, शस्त्रास्त्रे नसणा-या जनावरांवर मनोरंजनासाठी संस्कृती आणि परंपरेच्या नावे हल्ला करणे हे दहशतवादापेक्षाही भयंकर आहे. सरकार चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात कावळा आणि कुत्र्याला यातना देताना दाखवण्यास मज्जाव करते, मात्र संस्कृतीच्या नावाखाली बैलांना होणा-या त्रासाकडे दुर्लक्ष करते. एकंदरीतच जलिकट्टू हा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक-निर्माता रामगोपाल वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचीही खिल्ली उडवली होती. 'मफलर आणि टोपी घालून केजरीवाल एखाद्या माकडाप्रमाणे दिसतात, असे मला वाटायचे, मात्र लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यावरुन ते खरोखरच माकड असल्याचे सिद्ध झाले आहे', अशी उपहासात्मक टीका वर्मा यांनी केली होती.   

          Atleast 10 animals should be set after each #jaijallikattu human protestor for him to know what                       poor bull feels when 1000's are chasing