बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र राकेश यांचे शनिवारी बेल्जियमच्या रुग्णालयात निधन झाले. ते ३९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.राकेश मित्रांसमवेत परदेशी फिरायला गेले असता त्यांना अचानक त्रास सुरू झाला. त्यांना ब्रसेल्समधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाच्या आजारपणाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारीच तिथे रवाना झाले होते. मात्र राकेश यांची प्रकृती अचानक आणखी बिघडली आणि रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री वा सोमवारी बेंगळुरूमध्ये येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (वृत्तसंस्था)
राकेश सिद्धरामय्या यांचे निधन
By admin | Updated: July 31, 2016 05:34 IST