शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संसद सदस्यांचे सभात्याग सत्र, १२ सदस्यांचे निलंबन मागे घेण्यास राज्यसभा अध्यक्षांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:24 IST

Parliament : राज्यसभेतील १२ विरोधी सदस्यांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे, ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी सदस्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे केली.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राज्यसभेतील १२ विरोधी सदस्यांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे, ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी सदस्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे केली.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत या १२ सदस्यांनी गोंधळ घातला, त्याबद्दल त्यांना अजिबात पश्चात्ताप झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वच विरोधक सभागृहातून बाहेर पडले.

लोकसभेतही बहुमताच्या जोरावर मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. राज्यसभेचा विषय या सभागृहात चर्चा करता येणार नाही, असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितल्यावरही विरोधकांनी गदारोळ सुरू ठेवला. त्यामुळे सभागृहाचे कामकाम उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही त्याआधी तहकूब केले गेले.

सदस्यांना पश्चाताप नाही गेल्या अधिवेशनातील प्रकाराबद्दल या अधिवेशनात कारवाई करणे अयोग्य आहे. निलंबन अन्यायकारक व चुकीचे आहे, अशी तक्रार राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचे शिष्टमंडळ वेंकय्या नायडू यांना भेटले. पण, विरोधी सदस्यांना केलेल्या कृतीचा पश्चात्ताप झाला नसल्याने कारवाई मागे घेणे शक्य नाही, असे नायडू यांनी तसेच सरकारने नमूद केले.

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा