शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय प्रवेशाबद्दल स्वत: रजनीकांतच निर्णय घेतील - द्रमुक

By admin | Updated: May 16, 2017 10:55 IST

दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी तब्बल नऊ वर्षांनी काल थेट चाहत्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना रजनीकांत यांनी राजकीय भाष्य केले होते.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 16 - दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी तब्बल नऊ वर्षांनी काल थेट चाहत्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना रजनीकांत यांनी राजकीय भाष्य केले होते. त्यावर द्रमुकने राजकारणात प्रवेश करायचा कि, नाही ते सर्वस्वी रजनीकांत यांच्यावर अवलंबून आहे. ते त्यांनाच ठरवूं दे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तामिळनाडू विधानसभेचे विरोधीपक्षनेते एम.के.स्टालिन यांनी या विषयावर कोणतीही व्यक्तीगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 
 
रजनीकांत यांनी 1996 साली द्रमुक आघाडीला पाठिंबा दिला होता. आज रजनीकांत यांना त्यावेळी पाठिंबा देऊन पाण चूक केली असे वाटत आहे.  21 वर्षांपूर्वी एका राजकीय आघाडीला पाठिंबा देऊन आपण चूक केली होती. तो एक राजकीय अपघात होता असे द्रमुकचे नाव न घेता रजनीकांत काल म्हणाले. 
 
माझे आयुष्य देवाच्या हातात आहे. माझ्यासाठी त्याने पुढे काय ठेवले आहे याची मला माहिती नाही. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश केला नाही तर, निराश होऊ नका असे रजनी म्हणाले. रजनीकांत चार दिवस 17 जिल्ह्यातील त्याच्या चाहत्यांना भेटून त्यांच्यासोबत व्यक्तीगत फोटो काढणार आहेत.
 
सोमवारी सकाळी चेन्नईच्या राघवेंद्र हॉलमध्ये त्यांनी चाहत्यांची भेट घेतली.लाखो लोकांच्या गळयातील ताईत असलेल्या रजनीकांतबरोबरची भेट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे.  प्रत्येक जिल्ह्यातील रजनीच्या 200 ते 250 फॅन्सना या कार्यक्रमाचे पासेस देण्यात आले आहेत. 2008 साली अशा प्रकारने रजनीने चाहत्यांशी थेट संवाद साधला होता.