नवी दिल्ली : छत्तीसगढच्या सुकमा येथील नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २४ तरुण जवानांना हौतात्म्य आल्यानंतर जाग आलेल्या सरकारने या सशस्त्र दलाच्या महासंचालकपदी बुधवारी राजीव राय भटनागर यांची नेमणूक केली. आधीचे महासंचालक के. दुर्गाप्रसाद दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झाल्यापासून हे पद रिकामे होते. सरकार या पदासाठी गेल्या दोन महिन्यांपासून योग्य व्यक्तीच्या शोधात होते. भटनागर १९८३ च्या तुकडीचे आयपीएस असून याआधी ते नार्को टिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजीव भटनागर सीआरपीएफचे नवे महासंचालक
By admin | Updated: April 27, 2017 02:12 IST