शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांत उतरणार तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, उद्या करणार मोठी घोषणा

By बाळकृष्ण परब | Updated: November 29, 2020 20:16 IST

Rajinikanth News : तामिळनाडूतील राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देरजनीकांत हे सोमवारी आपल्या रजनी मक्कल मंडरम या पक्षाच्या जिल्हा सचिवांसोबत चर्चा करणार आहेतया चर्चेमध्ये रजनी हे पुढची विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईलजनीकांत हे गेल्या दोन वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर सक्रिय झालेले आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी राजकारणामध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केलेला नाही

चेन्नई - पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे तामिळनाडूमध्ये सध्या राजकीय वारे जोरात वाहत आहेत. सत्ताधारी अण्णा द्रमुक भाजपाच्या मदतीने राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकनेही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतीलराजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, रजनीकांत हे सोमवारी याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.रजनीकांत यांनी आपल्या राजकारणातील प्रवेशाबाबत मोठे विधान केले आहे. रजनीकांत हे सोमवारी आपल्या रजनी मक्कल मंडरम या पक्षाच्या जिल्हा सचिवांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये रजनी हे पुढची विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र ही बैठक ऑनलाइन होणार की प्रत्यक्ष होणार हे निश्चित झालेले नाही, असे रजनी यांच्या टीममधील सूत्रांनी सांगितले आहे.रजनीकांत यांनी सांगितले की, मी रजनी मक्कल मंडरममधील सदस्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर योग्य वेळी आपल्या राजकीय भूमिकेची घोषणा करेन. रजनीकांत हे गेल्या दोन वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर सक्रिय झालेले आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी राजकारणामध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केलेला नाही. गेल्या वर्षी दक्षिणेतील अजून एक सुपरस्टार कमल हसन यांनी रजनीकांत यांच्यासोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोघांच्याही पक्षात आघाडी होण्याचे वृत्त समोर आले होते.दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजपाही तामिळनाडूमध्ये आपला पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शाहा यांनी चेन्नईचा दौरा केला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पुढील निवडणुकीत अण्णा द्रमुक आणि भाजपा एकत्र लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यातच रजनीकांत यांनाही आपल्याकडे ओढण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान दोघांचीही भेट होऊ शकली नव्हती.

टॅग्स :rajinikanthरजनीकांतPoliticsराजकारणTamilnaduतामिळनाडू