शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातेरी महादेव देवस्थानचे राजेंद्र आजगावकर प्रशासक

By admin | Updated: August 17, 2015 00:08 IST

हणखणे : राज्य शासनाने कासारवर्णे-पेडणे येथील सातेरी महादेव देवस्थान ताब्यात घेऊन प्रशासक म्हणून मामलेदार राजेंद्र आजगावकर यांची नेमणूक केली. देवस्थानचा प्रसासक म्हणून मामलेदार आजगावकर यांनी शनिवारी (दि. 15) देवस्थानचा ताबा घेतला.

हणखणे : राज्य शासनाने कासारवर्णे-पेडणे येथील सातेरी महादेव देवस्थान ताब्यात घेऊन प्रशासक म्हणून मामलेदार राजेंद्र आजगावकर यांची नेमणूक केली. देवस्थानचा प्रसासक म्हणून मामलेदार आजगावकर यांनी शनिवारी (दि. 15) देवस्थानचा ताबा घेतला.
याबाबत माहिती देताना राजेंद्र आजगावकर यांनी सांगितले, सातेरी महादेव देवस्थान कासारवर्णेच्या महाजनांच्या दोन गटातील वादामुळे अनेक तक्रारी सरकार दरबारी आल्या होत्या. त्याची चौकशी करण्यासाठी दोन्ही गटांना नोटिसा बजावल्यानंतर चौकशीअंती त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन शासनाने देवस्थानचे अध्यक्ष वासु हरी नाईक यांच्या अधिपत्याखालील समिती बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक केली.
काहींची घरे देवस्थान कार्यक्रमातून वगळणे, काहींच्या घरी ब्रा?ाणांना जाण्यास मनाई करणे यासारख्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. आता प्रशासकाची नेमणूक झाल्याने आणि त्या पदावर शासनाने आपली नेमणूक केल्याने यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, अशी माहिती आजगावकर यांनी दिली.
सुरुवातीला येथील सातेरी मंदिरातील वस्तूंचा पंचनामा करून तेथील ताबा घेतला. याप्रसंगी महाजनांच्या दोन्ही गटातील लोक तसेच महिला उपस्थित होत्या. ताबा घेतल्यानंतर सातेरी मंदिराच्या मुख्य दरवाजाला नवीन कुलूप लावून एक चावी पुजारी महेश मराठे यांच्याकडे दिली.
त्यानंतर तेथून जवळच असलेल्या महादेव मंदिराकडे जाऊन तेथील वस्तूंचा पंचनामा करण्यासाठी मामलेदार गेले असता देवस्थानचे माजी अध्यक्ष वासू हरी नाईक यांनी त्या ठिकाणी येण्यास नकार दर्शवल्याने आणि बोलावूनही नाईक न आल्याने मामलेदारांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या सहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडले. तसेच आतील वस्तूंचा पंचनामा केला. दुपारी सुरू झालेली कार्यवाही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालली होती.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसफाटा मोठय़ा प्रमाणात होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उर्वरित ताबा मंगळवार दि. 18 रोजी देणार असल्याचे समितीने मामलेदारांना सांगितल्याने उर्वरित ताबा मंगळवारी घेणार आहेत. त्यामुळे नियमित कार्यक्रम पार पडतील, अशी आजगावकर यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली. (प्रतिनिधी)
फोटो : पंचनामा करताना मामलेदार राजेंद्र आजगावकर व कर्मचारी (महादेव च्यारी)