शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूचे आणखी ११ बळी, मृत्यूसंख्या १५३ वर

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जयपूर : राजस्थानच्या विविध भागांत स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.

जयपूर : राजस्थानच्या विविध भागांत स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.
जयपूर आणि जोधपूर येथे रविवारी प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर अजमेर येथे दोन जण आणि नागौर, भरतपूर व कोटा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरली आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूची लागण झालेले २१६७ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जयपूर जिल्ह्यात सर्वाधिक २६ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
लखनौमध्ये आढळले सात नवे रुग्ण
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शनिवारी आणखी सात जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. सध्या लखनौमधील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूचे ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत तिघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
५५०० कोटींचे नुकसान
महाराष्ट्र, राजस्थान आणि देशाच्या अन्य काही भागांत पसरलेल्या स्वाईन फ्लूमुळे पर्यटन आणि नागरी उड्डयन क्षेत्राचे किमान ५,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू पसरल्याने विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. हिवाळ्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये येत असत; परंतु आता या दोन्ही राज्यांमध्ये येणार्‍या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. (वृत्तसंस्था)