राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूचे आणखी ११ बळी, मृत्यूसंख्या १५३ वर
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.
राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूचे आणखी ११ बळी, मृत्यूसंख्या १५३ वर
जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.जयपूर आणि जोधपूर येथे रविवारी प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर अजमेर येथे दोन जण आणि नागौर, भरतपूर व कोटा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरली आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूची लागण झालेले २१६७ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जयपूर जिल्ह्यात सर्वाधिक २६ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.लखनौमध्ये आढळले सात नवे रुग्णउत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शनिवारी आणखी सात जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. सध्या लखनौमधील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूचे ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत तिघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. ५५०० कोटींचे नुकसानमहाराष्ट्र, राजस्थान आणि देशाच्या अन्य काही भागांत पसरलेल्या स्वाईन फ्लूमुळे पर्यटन आणि नागरी उड्डयण क्षेत्राचे किमान ५,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू पसरल्याने विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. हिवाळ्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये येत असत. परंतु आता या दोन्ही राज्यांमध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. (वृत्तसंस्था)