ऑनलाइन लोकमत
बाली (इंडोनेशिया), दि. १ - आयुष्यभर मी दहशवाताविरोधात लढलो असून मरेपर्यंत मी याविरोधात लढा देत राहीन अशी प्रतिक्रिया कुख्यात गुंड छोटा राजनने दिली आहे. तर दुसरीकडे बालीतील भारतीय दुतावासातील वरिष्ठ अधिकारी संजीवकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची भेट घेतली आहे.
छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात असून राजनला भारतात आणण्याची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. रविवारी सकाळी भारतीय अधिकारी संजीवकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनशी संपर्क साधला. अटकेनंतर छोटा राजनची अधिकृतरित्या भेट घेणारे अग्रवाल हे पहिले भारतीय अधिकारी आहेत. यानंतर छोटा राजनने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया दिली आहे. यात छोटा राजनने दहशवाताविरोधात लढत राहीन असे म्हटले आहे.