शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुरोहित संघ राज ठाकरे यांना देणार निमंत्रण ध्वजारोहण : राजी-नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी निमंत्रण देण्यावरून नाराज झालेले महापौर अशोक मुर्तडक आणि त्यानंतर राज ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याची टीका या पार्श्वभूमीवर श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यात येणार असून, मंगळवारी होणार्‍या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी निमंत्रण देण्यावरून नाराज झालेले महापौर अशोक मुर्तडक आणि त्यानंतर राज ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याची टीका या पार्श्वभूमीवर श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यात येणार असून, मंगळवारी होणार्‍या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ होणार त्या दिवशी म्हणजेच १४ जुलैस सकाळी ६.१६ वाजता रामकुंडावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या पारंपरिक ध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ प्रारंभ झाल्याचा संदेश दिला जात असतो. तथापि, यंदा ध्वजारोहण सोहळाच वादात सापडला आहे. पंचकोटी पुरोहित संघाने अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुंबई आणि दिल्ली गाठली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण दिले. निमंत्रण देताना शहराचे प्रथम नागरिक अशोक मुर्तडक यांना समवेत न नेल्याने मनसेने अगोदरच नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज याच कारणावरून रुष्ट झाले आणि आता तर ते पुरोहित संघाचे ध्वजारोहण मानण्यास तयार नाहीत. त्यातच पुरोहित संघाने अनेक केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे मनसेच्या नाराजीत भर पडली आहे. त्यामुळे शनिवारी नाशिक दौर्‍यावर येणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार असून, त्यांना पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देणार आहेत. मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यात येत असून, त्यांचा निरोप झाल्यानंतर लगेचच पुरोहित संघाचे पदाधिकारी हे निमंत्रण देणार आहेत. ध्वजारोहण सोहळ्यास अनेक मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले असले तरी आत्तापर्यंत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, वित्तमंत्री सुधीर मुनगं˜ीवार आणि खासदार रामदास आठवले यांनी निमंत्रण स्वीकृत केल्याचे कळविले आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे पुरोहित संघाचे म्हणणे आहे.