शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो- आठवले

By admin | Updated: July 27, 2016 22:28 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. देशातील दलितांवर वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा बनवण्यात आला आहे, असंही आठवलेंनी म्हटलं आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा आम्ही रद्द होऊ देणार नाही, अशी भूमिकाही आठवलेंनी मांडली आहे.राज ठाकरेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. त्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही. राज ठाकरे नेहमीच दलितविरोधी भूमिका मांडतात. कोपर्डीतल्या ज्या मुलीवर बलात्कार झाला, तिच्या आरोपींना पकडून कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी आम्ही केली असल्याचं यावेळी रामदास आठवलेंनी सांगितले.

(राज ठाकरेंच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा!)

कोपर्डीत झालेल्या बलात्कारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी शरियतसारखे कायदे देशात लागू करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यानं तो रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

(अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा- राज ठाकरे)दरम्यान, या वक्तव्यानंतर भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरेंविरोधात जालन्यात तक्रार दाखल केली आहे. "राज ठाकरे हे लोकशाहीविरोधी असून, त्यांना संविधान मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी दलितांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारिपने तक्रारीत केली आहे.