शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार

By admin | Updated: July 5, 2017 01:25 IST

सोमवारपासून संपूर्ण ईशान्य भारतात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि मेघालयातील

गुवाहाटी/इटानगर : सोमवारपासून संपूर्ण ईशान्य भारतात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि मेघालयातील जनजीवन पार विस्कळीत झाले असून, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर परिसरात पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. आसाममध्ये साडेतीन लाखांहून अधिक लोक बेघर झाले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.जोरदार पावसामुळे नहरलागून ते इटानगर यामधील राष्ट्रीय महामार्गाचा मोठा भाग वाहूनच गेला आहे. त्यामुळे राजधानीच्या शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा जुलांग रस्ताही पुरता खचून गेला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका पापुप पारे जिल्ह्याला बसला आहे. इटानगर व नहरलागून ही दोन्ही मोठी शहरे याच जिल्ह्यात आहेत. बारापानी नदीवरील हा पूरही पाण्याखाली गेला असून, पुराचे पाणी बंदेरवारा, निर्जुली, नहरलागून व इटानगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे घरे, रेल्वेमार्ग, रस्ते यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील नदीच्या किनारी तसेच पहाडी भागांत राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आल्या आहेत. सागली गावात अडकलेले चार रुग्ण, तीन मुले, महिला व विद्यार्थ्यांसह २0 जणांना हेलिकॉप्टरच्या साह्याने नहरलागून येथे हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तिथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत.आसाममध्ये दोन लहान मुले पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. ब्रह्मपुत्रा, दिखोव, जिया भारली, बराक आणि कुशियारा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने आसपासच्या नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आले आहे. आतापर्यंत त्या भागांत ७७ मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. आसाममधील  लखिमपूर, जोरहाट, गोलाघाट, धेमाजी, नागाव, विश्वनाथ, करीमगंज, सोनितपूर या भागांत पावसाचा  आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. (वृत्तसंस्था)