शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

जोरदार वार्‍यासह शहरात पावसाच्या सरी

By admin | Updated: May 8, 2014 22:06 IST

विजांचा कडकडाट : अनेक भागातील वीजपुरवठा खंडित

विजांचा कडकडाट : अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. वाढत्या तपमानामुळे नाशिकरांच्या अंगाची काहिली झालेली असतानाच सायंकाळी दाटून आलेले आभाळ आणि वाहणार्‍या वार्‍यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मात्र जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.
आजचा पारा वाढलेला असतानाच सायंकाळच्या सुमारास आभाळ दाटून आल्याने वातावरणात अधिकच उकाडा निर्माण झाला होता. पावसाच्या थेंबांसह जोरदार वाराही वाहू लागल्याने शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. विशेषत: नाशिकरोड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वार्‍यासह कोसळणार्‍या पावसामुळे या भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे पंचवटीतील काही भागात काहीकाळ पावसाने हजेरी लावली. सिडको, सातपूर येथेही आभाळ दाटून आले; मात्र या ठिकाणी तुरळक पाऊस झाला. नाशिकरोडसह शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली, तर बुधवार बाजारातही व्यापार्‍यांचे चांगलेच हाल झाले.
सायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे अगोदरच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर तेथील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
००००इन्फो----
तीन फिडर्स नादुरुस्त
जोरदार वार्‍यासह अवघ्या अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. सातपूर येथील ३३ केव्ही फिडरमध्ये बिघाड झाल्याने या फिडरवरील ग्राहकांना सुमारे तासभर वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे सातपूर, महात्मानगर, त्र्यंबकरोड, तसेच गंगापूर परिसरातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच ३३ केव्ही पंचक फिडरवरही स्ट्रिपिंग झाल्याने या फिडरवरील ग्राहकही हैराण झाले होते. टाकळी फिडर वाहिनीवर एकूण ११ ठिकाणी स्ट्रिपिंग झाल्यामुळे या वाहिन्यांवरील हजारो ग्राहकांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. वार्‍यासह पाऊस सुरू झाल्याने काही ठिकाणी वीज कंपनीनेच वीजपुरवठा तात्पुरता बंद केला होता. काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी करूनही सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ अनेक भागातील वीजपुरवठा खंडितच होता.