शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात पावसाचे ११ बळी

By admin | Updated: July 10, 2016 02:32 IST

मध्य प्रदेशला संततधार पावसाने झोडपून काढले असून, आतापर्यंत ११ लोक मृत्युमुखी पडले आहेत. सतना जिल्ह्यात लष्कराने सुमारे ४00 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशला संततधार पावसाने झोडपून काढले असून, आतापर्यंत ११ लोक मृत्युमुखी पडले आहेत. सतना जिल्ह्यात लष्कराने सुमारे ४00 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की, गेल्या तीन ते चार दिवसांत आठ लोक मृत्युमुखी पडले आहेत. भोपाळमध्ये दोन जण मरण पावले आहेत. याशिवाय टिकमगड, रेवा, झाबुआ, बेतूल, रायसेन आणि पन्ना येथे प्रत्येकी एक जण मरण पावला आहे. शाहपूर तलावाजवळ शनिवारी दुपारी एक जण वाहून गेला. तत्पूर्वी, मांडला आणि सिंगरौली जिल्ह्यांत प्रत्येकी एक जण मरण पावला होता. चौहान यांनी सांगितले की, नर्मदा नदी होशंगाबाद येथे धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. मदतीसाठी १0७९ हा दूरध्वनी क्रमांक सरकारने कार्यरत केला आहे. रविवारची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन मदत व बचाव कार्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)400 लोकांना रघुराज तालुक्यात लष्कराने सुरक्षित स्थळी हलविले. सतना जिल्ह्यात तमस, सोनी व मंदाकिनी या नद्यांना महापूर आला आहे. पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सागर, जबलपूर, होशंगाबाद, भोपाळ, इंदौर, उज्जैन आणि ग्वाल्हेर या ठिकाणांना पावसाचा धोका आहे. १ जूनपासून राज्यातील २५ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १६ जिल्ह्यांत सरासरीएवढा, तर ९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. केवळ एका जिल्ह्यात पावसाची तूट आहे.