शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाऊस गायब; डोळे आभाळाकडे

By admin | Updated: July 10, 2015 01:44 IST

वायव्य भारत वगळता जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसाचे नकारात्मक परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. अनेक भागांत दुबार पेरणीच्या संकटामुळे

नवी दिल्ली : वायव्य भारत वगळता जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसाचे नकारात्मक परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. अनेक भागांत दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. या महिन्याच्या प्रारंभी जवळपास सर्वच भागात पावसाने ओढ दिली असून १ जून ते ८ जुलै या काळात देशात ४ टक्के कमी पाऊस झाला आहे. कालपर्यंत हे प्रमाण उणे २ टक्के राहिले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) सूत्रांनी म्हटले आहे. मध्य भारतात जूनमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला असला तरी जुलै महिन्यात उणे ८ टक्के, दक्षिण भागात उणे ७ टक्के तर ईशान्य भारतात उणे ४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वायव्य भारतात जुलैच्या प्रारंभी बरा पाऊस झाला पण अलीकडे तेथेही पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसून आले.हवामान विभागाने यापूर्वीच देशात सामान्यापेक्षा कमी म्हणजे ८८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा १६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली; मात्र तरी जुलै आणि आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ आणि १० टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता पाहता एकूणच सरासरी कमी होणार आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने जुलैमध्ये सामान्यापेक्षा जास्त(१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य(९९ टक्के) तर सप्टेंबरमध्ये (९६ टक्के) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये ३० टक्के, कर्नाटक किनारपट्टी ३२ टक्के तर कोकण आणि गोव्यात १५ टक्के कमी पाऊस असण्याची शक्यताही या संस्थेने वर्तवली. (लोकमत न्यूज नेटवर्क)