शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

छतावरील प्रवासाची जबाबदारी रेल्वेची

By admin | Updated: July 7, 2016 04:01 IST

एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही

नवी दिल्ली : एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही ही रेल्वे थांबू शकली नाही. मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. भरपाई देण्यातून मुक्त करावे ही रेल्वेची याचिकाही खंडपीठाने फेटाळली. रेल्वेच्या छतावर मोठ्या संख्येने बसलेल्या लोकांना रेल्वे वेगात जाताना असा अपघात होऊ शकतो याची जाणीव असलीच पाहिजे. छतावर बसलेल्या लोकांनी अपघाताला हातभार लावला असला तरी रेल्वे प्रशासनाला दोषमुक्त करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. हा अपघात एक फेब्रुवारी २०११ रोजी बरेलीहून निघालेल्या जम्मू तावी-हावडा हिमगिरी एक्स्प्रेसला झाला. भारत- तिबेट सीमा पोलीस दलातील (आयटीबीपी) भरतीच्या निवडीसाठी लाखो तरुण आले होते. प्रचंड संख्येतील या जमावाला हाताळणे अवघड झाल्यानंतर आयटीबीपी अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. पर्यायाने निवड रद्द करण्यात आली. हे तरुण मग घरी जाण्यासाठी त्या दुर्दैवी रेल्वेत चढले. अनेक जण छतावरही गेले. रेल्वे दर तासाला ६० किलोमीटर या वेगाने प्रवास करीत होती. अपघात शाहजहानपूर जिल्ह्यात झाला. तेथे रेल्वेचे छत आणि फूट ओव्हर ब्रीज यांच्यातील अंतर तीन मीटरपेक्षाही कमी होते. अपघात झाल्यानंतरही रेल्वे तीन किलोमीटर पुढे गेली व नंतर थांबली. तेथे मग रक्ताळलेल्या छतावरून मृत तरुणांचे मृतदेह खाली घेण्यात आले.