शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत बदलणार रेल्वेचे रुपडे

By admin | Updated: October 9, 2015 00:55 IST

येत्या दिवाळीत रेल्वेच्या डब्यांचे पालटलेले रूप बघायला मिळेल. दशकानुदशकांपासून तेच जुने घासलेले, फाटलेले डबे बघत आलेल्या प्रवाशांना डब्यांचे नवे डिझाईन आकर्षित करणारे ठरेल

नवी दिल्ली : येत्या दिवाळीत रेल्वेच्या डब्यांचे पालटलेले रूप बघायला मिळेल. दशकानुदशकांपासून तेच जुने घासलेले, फाटलेले डबे बघत आलेल्या प्रवाशांना डब्यांचे नवे डिझाईन आकर्षित करणारे ठरेल. लांब पल्ल्याच्याच नव्हे तर पॅसेंजर गाड्यांनाही नवे डबे जोडलेले दिसतील. भोपाळच्या कार्यशाळेत तयार झालेले नवे डबे प्रवासाला निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत.नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनने डब्यांची नवी रचना तयार केली आहे. सध्याच्या डब्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला असून सर्वसाधारण, शयनयान ते वातानुकूलित वन, टू, थ्री टायरपर्यंत चकचकीत डब्यांनी रेल्वेला नवी झळाळी लाभणार आहे.बर्थचे डिझाईन असो की शौचालयातील रचना असो कमी जागेच्या वापराचे सूत्र ठेवत हा बदल केला गेला आहे. प्रवाशांना सुलभ प्रवेश, स्वच्छता राखण्यात अधिक श्रम लागू नये अशी ही रचना आहे. वरच्या बर्थसाठी शिड्याही आकर्षक आहेत. जेवणासाठी असलेल्या ट्रेची रचनाही बदलण्यात आली आहे. शौचालये सोप्या पद्धतीने स्वच्छ ठेवता येतील आणि कोरडी राहतील अशा पद्धतीची असतील. डब्यातील जुन्या बल्बची जागा नव्या एलईडींनी घेतली आहे. एकच रंग न ठेवता विविध रंगांचा वापरही मुक्तपणे करण्यात आला आहे. ‘एक भारत एक रेल्वे’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविलेली कल्पना प्रत्यक्षात आणताना रंगसंगती साधण्यात आली आहे.