शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

रेल्वे प्रवाशांना मिळणार आता १० लाखांचा अपघात विमा!

By admin | Updated: July 25, 2016 04:15 IST

प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीप्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे. हा विमा ऐच्छिक असेल व त्यात प्रवाशास अपघातात मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्याची सोय असेल. हा विमा एका तिकिटावर केल्या जाणाऱ्या एका वेळच्या प्रवासासाठी लागू असेल. याचबरोबर सामानाचाही विमा उतरविण्याची सोय रेल्वे उपलब्ध करून देणार आहे.आॅनलाइन रेल्वे आरक्षणाची व्यवस्था पाहणाऱ्या ‘आयआरसीटीसी’ या रेल्वेच्या उपक्रमामार्फत ही विमा योजना राबविण्यात येईल. यासाठी रेल्वेने सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी तीन कंपन्यांची निवड रीतसर टेंडर काढून करण्यात आली असून, त्यांच्याशी यासाठी करार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शक्यतो आॅगस्ट महिन्यापासूनच ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.अशी विमा योजना सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प मांडताना केली होती.येत्या महिन्यापासून ऐच्छिक सुविधासुरुवातीस आॅनलाइन रेल्वे तिकिटे काढणाऱ्यांसाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार. नंतर ती तिकीट खिडक्यांवरून तिकिटे व मासिक पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही उपलब्ध करून देण्याची योजना आहे. हा विमा ऐच्छिक असल्याने आॅनलाइन तिकिटाचे बुकिंग करताना अगोदर विम्याच्या कॉलममध्ये प्रवाशाला आपली संमती नोंदवावी लागेल. विमा हवा असा पर्याय निवडल्यास तिकिटाच्या भाड्यासोबत विम्यासाठी द्यावी लागणारी रक्कमही त्यात आपोआप जोडली जाईल.प्रीमियम किती असेल?ई-तिकीट काढताना प्रवाशाला विमा हवा की नको, याचा पर्याय विचारला जाईल. विम्याच्या प्रीमियमची रक्कम प्रवासाचा वेळ व अंतर यावर अवलंबून असेल. विमा कंपनीची निवड केल्यावर तिच्याशी चर्चा करून विमा पॉलिसीचा तांत्रिक तपशील ठरविला जाईल.तर ५० लाखांपर्यंतचे कवचही मिळेल प्रवाशांना इच्छेनुसार विम्याची रक्कम वाढवून घेण्याचा पर्याय देण्याचाही विचार आहे. तूर्तास विम्याची कमाल रक्कम १० लाख ठरविली आहे. ही योजना कितपत यशस्वी होते हे पाहून प्रवाशांना हवा असल्यास त्यानुसार प्रीमियम घेऊन ५० लाखांचाही विमा दिला जाऊ शकेल. या खेरीज प्रवासात सामानाचाही विमा उतरविण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.रेल्वे कायद्यानुसार प्रवासात मृत्यू झाल्यास रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरण यांच्याकडून चार लाखांची भरपाई मिळू शकते. रेल्वे अपघात २०१२-१३ १२३२०१३-१४ ११८ २०१४-१५ १३५ २०१५-१६ १०० अपघातग्रस्थांना मदत२०१२-१३ ३.१८ कोटी रु., २०१३-१४ १.४९ कोटी रु., २०१३-१४ १.२७ कोटी रु. २०१५-१६ १.१ कोटी रुपये