शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणूक राहुलजी जिंकून देतील

By admin | Updated: July 10, 2017 00:24 IST

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुलजी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये पूर्ण झाल्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा येईल व सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुलजी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.सलग चार वेळा गुणा येथून निवडून आलेले व लोकसभेत काँग्रेसचे मुख्य प्रतोत असलेले शिंदे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असेही म्हणाले की, काँग्रेसच्या दृष्टीने आता आत्मचिंतनाचा काळ संपला असून पक्षाने आता २०१९ ची निवडणूक डोळ््यापुढे ठेवून निश्चित असा कार्यक्रम आखायला हवा.एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, राहुल गांधी सध्याही काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत व भविष्यातही नेतृत्व करत राहतील. राहुल गांधी यांना समर्थन देण्यावर विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता असल्याने तेच आगामी निवडणुकीत विरोधकांचा चेहरा म्हणून लोकांपुढे जातील.शिंदे असेही म्हणाले की, सन २००३-०४ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘रालोआ’ सरकारने ‘इंडिया शायनिंग’चा खूप गवगवा केला. पण लोकांनी त्यांना नाकारले. अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे सर्वच लोकांना सदा सर्वकाळ फसविता येत नाही. त्यामुळे पायाखालची वाळू सरकू लागलेले आताचे मोदी सरकारही केवळ प्रसिद्धीतंत्राने टिकू शकणार नाही.पण त्याचबरोबर काँग्रेसलाही नवा कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जावे लागेल व लोकांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागेल, असे सांगून ते म्हणाले की, २०१४ नंतर आता तीन वर्षे उलटली. त्यामुळे आत्मचिंतन करून त्या पराभवाची कारणे शोधण्याचा काळ आता संपला आहे. आता काँग्रेसला निश्चित ध्येयधोरणे व कार्यक्रम घेऊन प्रत्येक निवडणुकीत उतरावे लागेल.>केवळ मोदीकेंद्रित टीका करून भागणार नाही. काँग्रेसला स्वत:ची धोरणे, विचार व कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जाऊन जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागेल. यासाठी पक्षात गुणवत्ता व क्षमता याला प्राधान्य द्यावे लागेल.- ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ काँग्रेस नेते