शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

राहुल गांधींची चीन भेट...हे तर "भक्तां"चं षडयंत्र - काँग्रेस

By admin | Updated: July 10, 2017 14:58 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचं काँग्रेसकडून खंडन करण्यात आलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचं काँग्रेसकडून खंडन करण्यात आलं आहे. शनिवारी राहुल गांधींनी लुओ झुओई यांच्या भेट घेतल्याच्या बातम्या येत होत्या. काँग्रेसनेही हे वृत्त खोटं असल्याचं सांगत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे दिल्लीमधील चीनी दुतावासाने यासंबंधी आपल्या वेबसाईटवर (http://in.china-embassy.org) टाकलेलं स्टेटमेंट नंतर डिलीट करुन टाकल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे. 
आणखी वाचा 
चीनच्या मुद्द्यावर तुम्ही शांत का ? राहुल गांधींचा मोदींना सवाल
सिक्किमप्रश्नी कूटनीतीच्या माध्यमातूनच तोडगा, भारताची स्पष्ट भूमिका
तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी
 
राहुल गांधी यांनी लुओ झुओई यांची भेट घेत सध्या भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन सुरु असलेल्या वादावर चर्चा केल्याचं सांगण्यात येत होतं. काँग्रेसने मात्र ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस यासंबंधी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
 
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्टिवरच्या माध्यमातून आरोप केला आहे की, "काही न्यूज चॅनेल्स राहुल गांधी आणि लुओ झुओई यांच्यात भेट झाल्याच्या खोट्या बातम्या चालवत आहेत". या बातम्या परराष्ट्र मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणांकडून पेरण्यात आल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 
 
काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख राम्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीत सीमारेषेचा मुद्दा का उपस्थित केला नाही यावरुन आश्चर्य व्यक्त केलं होतं. इतकंच नाही तर राहुल गांधी जर चीनी राजदूताला भेटले असतील तर त्यात मला काही वादासारखं दिसत नाही असंही त्या बोलल्या होत्या. 
 
राहुल गांधीनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गट करत चीनच्या मुद्यावर शांत का ? असा सवाल विचारला होता. याआधी बुधवारीही राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा दुबळे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला होता.  एच-1बी व्हिसा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल आणि अमेरिकेने ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा उल्लेख केला असताना त्याचा विरोध न केल्याबद्दल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दुबळे पंतप्रधान संबोधले होते. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं होतं.