शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचे दहशतवाद्यांसोबत साटेलोटे

By admin | Updated: November 22, 2015 03:03 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी राजकीय लाभासाठी दहशतवाद्यांसोबत संगनमत करून पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खळबळजनक आरोप

सुखबीर बादल यांचा आरोप : पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा कट; राजकारण पेटलेनवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी राजकीय लाभासाठी दहशतवाद्यांसोबत संगनमत करून पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खळबळजनक आरोप या राज्याचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी शनिवारी केला. सत्ताधारी शिरोमणी अकाली दलाचे (बादल) अध्यक्ष बादल यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन काँग्रेसविरुद्ध कारवाई तसेच या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान काँग्रेसने बादल यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. दिल्ली दौऱ्यावर आलेले बादल यांनी पत्रपरिषद घेऊन काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. गेल्या १० नोव्हेंबरला अमृतसरमध्ये आयोजित एका सभेत काँग्रेस नेते फुटीरवादी आणि दहशतवादी तत्त्वांसोबत व्यासपीठावर बसले होते. एवढेच नाही तर या सभेत खलिस्तान स्थापनेसंबंधी प्रस्तावही पारित करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी या सभेच्या आयोजनात फुटीरवाद्यांना भरपूर मदत केली आणि यासाठी त्यांना राहुल गांधी यांचा पूर्ण पाठिंबा होता. काँग्रेस नेते ज्या लोकांसोबत सभेत सहभागी झाले होते त्यांचे पाकिस्तान व त्याची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध आहेत, असे बादल यांचे म्हणणे होते. काँग्रेस देशद्रोही पक्षकाँग्रेस हा देशद्रोही पक्ष असल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाने या पक्षाची मान्यता रद्द करावी; तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने या पक्षाच्या हालचालींवर नजर ठेवावी, अशी मागणी सुखबीर बादल यांनी केली. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शिरोमणी अकाली दलाने कधीही दहशतवाद्याच्या सुटकेची मागणी केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)अमरिंदरसिंग यांनी आरोप फेटाळले

नवी दिल्ली : काँग्रेस दहशतवादी आणि देशद्रोही शक्तींना पाठिंबा देत असल्याबाबत पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी केलेले आरोप लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते अमरिंदरसिंग यांनी फेटाळले आहेत. बादल आपल्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा पलटवारही त्यांनी केला.