राहुल गांधी यांचा पक्ष निवडणुकांवर भर मार्चपासून प्रक्रिया सुरू होणार
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
नवी दिल्ली : काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांना होत असलेल्या विलंबावर पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर येत्या मार्चमध्ये या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे़ लोकसभा आणि विविध राज्यांतील ताज्या विधानसभा निवडणुकांतील ताज्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवरील बदलांना वेग देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे़
राहुल गांधी यांचा पक्ष निवडणुकांवर भर मार्चपासून प्रक्रिया सुरू होणार
नवी दिल्ली : काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांना होत असलेल्या विलंबावर पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर येत्या मार्चमध्ये या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे़ लोकसभा आणि विविध राज्यांतील ताज्या विधानसभा निवडणुकांतील ताज्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवरील बदलांना वेग देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे़संघटनात्मक निवडणुकीच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली़ काँग्रेस सरचिटणीस आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मुल्लापल्ली रामचंद्रन यावेळी हजर होते़ त्यांच्याकडे पक्ष संघटनेच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे़या बैठकीत राहुल यांनी पक्ष सदस्यत्व मोहिमेला आणखी मुदतवाढ देण्यास नकार दिल्याचे कळते़ त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस काँगे्रस सदस्यत्व मोहीम थांबवली जाईल़ गतवर्षी ३१ डिसेंबरला ही मोहीम संपणार होती़ मात्र तिला मुदतवाढ देण्यात आली होती़ यानंतर मार्च महिन्यात पक्षाध्यक्षाच्या निवडीसह काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे़ सन २०१० मध्ये बिहार विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या पराभवाची मालिका अद्यापही थांबलेली नाही़ गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला दारुण पराभवाचे तोंड पाहावे लागले होते़ या पराभवामागच्या मुख्य कारणांमध्ये संघटनात्मक पातळीवर पक्षाची कमजोर होत चाललेली पकड हेही एक कारण होते़ त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमध्ये पुन्हा नवा प्राण फुंकण्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्या, अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे़ तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी त्यांची पूर्वापार भूमिका राहिली आहे़