नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कैलास-मानसरोवर यात्रेला जाण्याची इच्छा बोलून दाखवल्यापासून वाद निर्माण झाला आहे. गांधी यांनी केलेल्या विनंतीला परराष्ट्र मंत्रालयाने काहीही प्रतिसाद दिलेला नाही, असा दावा राहुल गांधी यांच्या जवळच्या सूत्रांनी केला.वस्तुस्थिती अशी आहे की परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून राहुल यांनी अर्ज केलेला नव्हता. त्यांनी यात्रेसाठी संसद सदस्यांसाठी असलेली विशेष परवानगी मागितली होती. काँग्रेसचे अधिकृत वृत्तपत्र ‘नॅशनल हेराल्ड’ ने म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या विनंतीला परराष्ट्र खात्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. राहुल गांधी कैलास-मानसरोवर यात्रेसाठी ठराविक मुदतीत अर्ज करू शकले नाहीत. त्यांनी विशेष परवानगीसाठी अर्ज केला. ही परवानगी सामान्यत: संसद सदस्यांना दिली जाते. गांधी यांच्या अर्जावर काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.
राहुल गांधींची मानसरोवर यात्रा वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 03:54 IST