शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

राहुल गांधी यांच्याकडे लवकरच पक्षाची धुरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 01:15 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच पक्षाचे अध्यक्ष होतील, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. राहुल हे सध्या सुट्यांसाठी युरोपला गेले असून पुढील आठवड्यात तेथून

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच पक्षाचे अध्यक्ष होतील, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. राहुल हे सध्या सुट्यांसाठी युरोपला गेले असून पुढील आठवड्यात तेथून परतल्यानंतर लगेच ते पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळतील असे या सूत्रांचे म्हणणे आहे.गेल्या २७ डिसेंबरला राहुल गांधी यांनी स्वत: टिष्ट्वट करून आपण सुट्यांसाठी युरोप दौऱ्यावर जात असल्याचे जाहीर केले होते. आपल्या विदेश दौऱ्याबाबतची माहिती त्यांनी प्रथमच सार्वजनिक केली होती. ८ जानेवारीच्या जवळपास राहुल गांधी परतणार असून त्यानंतर लगेच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. याच बैठकीत संघटनात्मक निवडणुकांना वेग येईल आणि राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होईल, असे संकेत आहेत. दरम्यान पक्ष सूत्रांकडून संकेत प्राप्त झाले असले तरी काँग्रेसतर्फे अद्याप राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांच्यासह काही पक्षनेत्यांनी राहुल यांना पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली पाहिजे असे मत मांडले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही हीच इच्छा आहे. परंतु यासंदर्भातील कुठलाही निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीच घेऊ शकतात,असे पक्षसूत्रांनी नामोल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले.