शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी आज शेतकऱ्यांना भेटणार

By admin | Updated: April 18, 2015 00:16 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांना भेटून वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबतचे त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.

नवी दिल्ली : ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांना भेटून वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबतचे त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.मोदी सरकारच्या प्रस्तावित भूसंपादन कायद्याच्या निषेधार्थ येत्या रविवारी काँग्रेसने ‘किसान रॅली’चे आयोजन केले आहे. या रॅलीच्या एक दिवस आधी राहुल शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे समजून घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातील विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांना राहुल भेटतील. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश आणि दिग्विजयसिंह त्यांच्या सोबत असतील. २०११ मध्ये भट्टा परसौल गावातून राहुल यांनी शेतकऱ्यांच्या बळजबरीच्या भूसंपादनाविरोधात पदयात्रा काढली होती. या गावातील एक शिष्टमंडळही राहुल यांना भेटले. राहुल यांच्या याच पदयात्रेनंतर तत्कालीन संपुआ सरकारने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा-२०१३ संमत केला होता.रविवारच्या ‘किसान रॅली’स काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल दोघेही संबोधित करणार असल्याचे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे. ५७ दिवसांच्या सुटीनंतर राहुल गांधी सक्रिय राजकारणात परतल्याची घोषणा, तसेच पक्षाच्या शक्तिप्रदर्शनाच्या रूपात या रॅलीकडे बघितले जात आहे. एफएम रेडिओवरून काँग्रेसने या रॅलीचा प्रचार चालवला आहे.