शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी मोदींइतकेच लोकप्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:14 IST

पंतप्रधानांच्या चाहत्यांची संख्या घटली : एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीचा सर्व्हे

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शनिवारी चार वर्षे पूर्ण करीत असताना होत असली तरी मोदींच्या लोकप्रियतेत कमालीची घट झालेली दिसून येत आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरित्या केलेल्या सर्व्हेनुसार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील लोकप्रियतेत असलेली तफावत घटत चालली आहे. मागच्या एका वर्षांत जनमानसात असलेली नाराजीच्या (अँटी इन्कम्बन्सी) बाबतीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात असलेला फरक आधीपेक्षा निम्याने घटला आहे. या सर्व्हेतील निष्कर्षांनुसार असे दिसत आहे की राजस्थान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुका भाजपाला जड जाण्याची चिन्हे आहेत.सर्व्हेचा हा तिसरा टप्पा आहे. १९ राज्यांमध्ये १५ हजारांहून अधिक लोकांची मते घेण्यात आली. हा सर्व्हे २० एप्रिल ते १७ मे २०१८ या कालावधीत घेण्यात आला आहे. या सर्व्हेचे आधीचे दोन टप्पे उत्तर प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रकाशित करण्यात आले होते. सर्व्हेतून असे दिसून आले होते की भाजपाप्रणित एनडीएविरोधातील नाराजीमध्ये वाढत चालली आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएविरोधातील नाराजी घटत चालली आहे.सर्व्हे असेही सांगतो की, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना ४३ टक्के लोकांनी तर तितक्याच जणांनी राहुल गांधी यांनी पसंती दर्शविली आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे तर नरेंद्र मोदी यांची त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली लोकप्रियता घटत चालली आहे.25%लोक म्हणाले की, त्यांना मोदी आधी आवडत नव्हते. आता आवडत आहेत. राहुल यांच्या बाबतीत हाच आकडा २९ टक्के इतका आहे.35%लोकांना मोदी आधी आवडत होते परंतु आता त्यांना मोदी आवडत नाहीत. राहुल गांधी यांच्या बाबतीत हे प्रमाण २२ टक्के इतके आहे.

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसला जनतेचे पाठबळ; भाजपापेक्षा अधिक मतेया दोन्ही राज्यांमध्ये कॉँग्रेसला भाजपापेक्षा अनुक्रमे १५ टक्के व ५ टक्के मतदान अधिक होईल, असे सर्वेत म्हटले आहे. म्हणजेच कॉँग्रेसची सत्ता दोन्ही ठिकाणी येईल.देशातील निम्म्याहून अधिक अल्पसंख्यांक आणि दलित समाजातील नागरिक नरेंद्र मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी देण्याच्या विरोधात आहेत. वरच्या वर्गातील हिंदू आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) मात्र मोदी सरकारला आणखी संधी देण्यासाठी अनुकूल दिसत आहेत. या सर्व्हेतून असा स्पष्ट निष्कर्ष निघतो की, भाजपाविरोधात जनतेत नाराजी वाढत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी