बालकोट : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नियंत्रण रेषेजवळील पूंछ भागाला भेट देऊन पाकिस्तानी सैनिकांच्या तोफगोळ्यांची व गोळीबाराची झळ पोहोचलेल्या कुटुंबांची भेट घेऊन आस्थेने संवाद साधला. कायम जीव मुठीत धरून जगणाऱ्या या लोकांचे केंद्र सरकारने पुनर्वसन करतानाच त्यांना योग्य नुकसानभरपाई आणि विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.राहुल गांधी यांनी बुधवारपासून तीन दिवसांचा जम्मू-काश्मीर दौरा सुरू केला आहे. प्रियजनांना गमवावे लागल्याच्या तुमच्या दु:खात मी सहभागी आहे. तुमची वेदना मी समजू शकतो, असे राहुल गांधी यांनी अजीम यांच्याशी बोलताना म्हटले. अजीम यांचे एक बंधू अमीन गोळीबारात मारले गेले, तर दुसरे बंधू रमीझ हे जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)
राहुल गांधींनी ऐकली पूंछवासीयांची कैफियत
By admin | Updated: August 27, 2015 04:20 IST