शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अब्रुनुकसानीच्या खटल्याला सामोरे जाणार राहुल गांधी

By admin | Updated: September 1, 2016 15:51 IST

महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान मागे घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींविरोधात हा खटला चालणार आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरं जाणार आहे. महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान मागे घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींविरोधात हा खटला चालणार आहे. भिवंडी न्यायालयात हा खटला चालणार आहे. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून खटल्याला सामोरं जाण्यास आपण तयार असल्याचं राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे, तसंच आपल्याविरोधात अब्रुनूकसानीचं प्रकरण रद्द करण्यासाठी केलेली याचिकाही मागे घेतली आहे. 
 
2014 लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान राहुल गांधींनी आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून हत्या केली असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध
अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता.
 
'महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मागे घेणार नाहीत. ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, आणि कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहेत', याची नोंद आपल्या ऑर्डरमध्ये करावी अशी विनंती कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने कपिल सिब्बल यांची ही मागणी फेटाळली.
 
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना खटला चालू असताना न्यायालयात हजर न राहण्यापासून सूट देण्यास नकार दिला आहे. कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाखाली प्रभावित न होता हा खटला चालवला जाईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 
 
राहुल गांधी आपल्या म्हणण्यावर कायम आहेत असं राहुल गांधी यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये म्हटले होते. अर्जात  राहुल गांधी यांनी भिवंडीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नव्हे, तर संघटनेच्या विचारांना गांधींचे मारेकरी ठरविले, असं सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रकरण पुढे सुरू ठेवायचे की, फेटाळून लावायचे, याचा निर्णय न्यायालय आज देणार होतं. त्यानुसार न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.