नवी दिल्ली : काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा सुटीवर गेले आहेत. युरोपमध्ये ते आपली सुटी घालवणार आहेत. सोमवारी खुद्द राहुल यांनी टिष्ट्वटरवरून याबाबत माहिती दिली. मी काही दिवसांसाठी सुटीसाठी युरोपात जात आहे. देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा, असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे. याचवर्षी फेबु्रवारीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राहुल कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ५६ दिवसांच्या सुटीवर गेले होते. मात्र ते कुठे गेले, किती दिवसांसाठी गेले, हे ते सुटीवरून परतेपर्यंत गुलदस्त्यात होते. यावरून विरोधकांनी रान माजवले होते. यावेळी मात्र राहुल यांनी सुटीवर जाण्याआधी अधिकृतपणे त्याबाबत माहिती दिली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
राहुल गांधी सुटीसाठी युरोपला
By admin | Updated: December 29, 2015 02:50 IST