स्वामी जनार्दन आश्रमात त्रिदिनात्मक दत्तयाग
By admin | Updated: May 8, 2014 18:22 IST
येवला : सावरगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात विश्व कल्याणार्थ त्रिदिनात्मक दत्तयाग सोहळ्याचे आयोजन २३ ते २५ मे दरम्यान करण्यात आल्याची माहिती महंत बापू कुलकर्णी यांनी दिली.
स्वामी जनार्दन आश्रमात त्रिदिनात्मक दत्तयाग
येवला : सावरगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात विश्व कल्याणार्थ त्रिदिनात्मक दत्तयाग सोहळ्याचे आयोजन २३ ते २५ मे दरम्यान करण्यात आल्याची माहिती महंत बापू कुलकर्णी यांनी दिली.अखिल भारतीय कुंभमेळा परिषदेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्णजी महाराज, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. काशिनाथ महाराज (भिवंडी) यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मे शुक्रवारी ह.भ.प. निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांचे स. ९ ते ११ हरीकीर्तन व २५ मे रोजी भव्य पालखी सोहळा व महामंडलेश्वर अमृतदासजी जोशी यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.विविध ठिकाणचे मान्यवर संत या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन कुलकर्णी, संभाजी पवार यांच्यासह सावरगाव ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)