शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यासमोर राडा

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

कोल्हापूर : पोलिस ठाण्यात वाद मिटविण्यासाठी आलेल्या विचारेमाळ येथील निळा रक्षक बॉईजच्या दोन गटांत शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा झाला. पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करून सर्वांना पिटाळून लावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आठजणांना ताब्यात घेतले.

कोल्हापूर : पोलिस ठाण्यात वाद मिटविण्यासाठी आलेल्या विचारेमाळ येथील निळा रक्षक बॉईजच्या दोन गटांत शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा झाला. पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करून सर्वांना पिटाळून लावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आठजणांना ताब्यात घेतले.

चोरट्यांनी बंगला फोडला
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस असलेल्या त्रिवेणी रेसिडेन्सीमध्ये निवृत्त प्राध्यापकाचा बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

वाळू तस्करीचे १८ ट्रक पकडले
कवठेमहांकाळ (जि. सांगली) : मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाळू तस्करी करणार्‍या १८ ट्रकवर कारवाई करून कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी शनिवारी वाळू तस्करांना मोठा झटका दिला. सांगोला हद्दीत वाळूचे ट्रक लपविण्यात आले होते. यामध्ये २४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विवाहितेची आत्महत्या
देशिंग (जि. सांगली) : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतल दत्ताजी खंडागळे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

शॉर्टसर्किटने आग लागून घर खाक
पाटण (जि. सातारा) : साखरी (ता़ पाटण) येथे आग लागून राहते घर खाक झाले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा ग्रामस्थांचा कयास आहे़ आगीत संसारोपयोगी साहित्यासह दागिने, कपडे, भांडी असे मिळून आठ लाख पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.

पर्स पळविणार्‍या दोघांना अटक
सातारा : दुचाकीवरील महिलेची पर्स हिसकावून चोरून नेणार्‍या दोघांना सातारा तालुका पोलिसांनी शिताफीने पकडले. आत्तापर्यंत पाच महिलांची पर्स लांबविल्याची कबुली त्यांनी दिली आहे. शंकर श्रीरंग शिंदे (वय २२), प्रकाश सुदाम घाडगे (२८, दोघेही रा. भोंदवडे, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हत्तींकडून शेतीचे नुकसान
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : गेले पंधरा दिवस दडी मारलेल्या हत्तींनी पुन्हा घाटीवडे येथे येऊन येथील नारायण गवस यांच्या शेती बागायतीत घुसून मोठ्या प्रमाणात हजारो रुपयांचे नुकसान केले आहे.

तिलारी नदीपात्रात मासेमारीला जोर
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : तालुक्यातील तिलारी नदीपात्रात जाळ्याच्या साहाय्याने मासेमारी केली जात आहे. हे मासे विक्रीसाठी दोडामार्ग बाजारपेठेत येत असून, ग्राहकांचंी खरेदीसाठी झुंबड उडत आहे.

बंदूकप्रकरणी चार अटकेत
चिपळूण (जि. रत्नागिरी) : भोम-गणेशखिंड मार्गावर विनापरवाना बंदूक वापरल्याप्रकरणी तिघांना व बंदूक बनविणार्‍या एकाला अटक केली.

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
चिपळूण (जि. रत्नागिरी) : रस्ता बंद केल्यामुळे घाणेकरवाडी व गोपाळवाडी ग्रामस्थांच्या दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कारवाईबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याने घाणेकरवाडी, गोपाळवाडी ग्रामस्थांनी दि. २१ फेब्रुवारी रोजी होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.