साडेतीन लाख हेक्टरवर होणार रबीची पेरणी पेरणीत दुपटीने वाढ : हरभर्याचा पेरा सर्वाधीक वाढणार
By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST
लातूर : अल्पपर्जन्यमान झाल्याने खरीप हंगाम हातचा गेला आहे़ त्यामुळे शेतकर्यांच्या आशा रबी हंगामाकडे लागल्या आहेत़ गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पावसाने ३५८़२ मि़मी़ पावसाची सरासरी ओलांडली आहे़ यामध्ये खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८८ हजार तर पिकाखालील क्षेत्र १ लाख ८७ हजार राहणार आहे, असे एकूण ३ लाख ९५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे़
साडेतीन लाख हेक्टरवर होणार रबीची पेरणी पेरणीत दुपटीने वाढ : हरभर्याचा पेरा सर्वाधीक वाढणार
लातूर : अल्पपर्जन्यमान झाल्याने खरीप हंगाम हातचा गेला आहे़ त्यामुळे शेतकर्यांच्या आशा रबी हंगामाकडे लागल्या आहेत़ गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पावसाने ३५८़२ मि़मी़ पावसाची सरासरी ओलांडली आहे़ यामध्ये खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८८ हजार तर पिकाखालील क्षेत्र १ लाख ८७ हजार राहणार आहे, असे एकूण ३ लाख ९५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे़ लातूर जिल्ात जून व ऑगस्टमध्ये सरासरी ५२०़१ तर २१२़५ मि़मी़ प्रत्यक्ष पाऊस झाला आहे़ खरीप हंगामामध्ये अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रापैकी साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी झाली़ परंतू पुन्हा उघडीप दिल्याने उर्वरित पिकेही मोडीत काढण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे़ त्यामुळे खरीप गेला रबी तरी येईल, या आशेवर जिल्हाभरातील शेतकरी होता़ परंतु सप्टेंबरमध्ये गेल्या पाच-सहा दिवसांपासून पाऊस सुरु झाल्याने पावसाची सरासरी ६५०़१ मि़मी़ तर प्रत्यक्ष पाऊस ३५८़२ मि़मी़ असा एकूण ५५़१ मि़मी़ पर्यंत पावसाची टक्केवारी गेली आहे़ रबीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८८ हजार आहे़ तर प्रत्यक्ष पेरा होणारे क्षेत्र १ लाख ८७ हजार आहे़ मोडीत काढलेले क्षेत्र २० हजार हेक्टर आहे़ त्यामुळे जिल्ातील एकंदर परिस्थितीचा विचार करता ३ लाख ९५ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे़ यामध्ये सर्वाधिक १ लाख ५० हजार हेक्टरवर हरभर्याची पेरणी होणार आहे़ तर उर्वरीत २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर स्वारी, गहू, सूर्यफूल, करडी आदी पिकांची पेरणी १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत केली जाणार आहे़ २० हजार मोडीत हेक्टरवर पेरा़़़रबी हंगामाच्या प्रत्यक्ष पेर्यामध्ये २० हजार हेक्टर क्षेत्राची आणखी भर पडणार आहे़ खरीप हंगाम अल्पपर्जन्यमानअभावी हातचा गेला होता़ त्यामुळे अनेक शेतकर्यांनी खरीपातील पेरलेली पिके मोडीत काढली़ दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही शासनाने मात्र याची म्हणावे तशी दखल घेतली नाही़ परिणामी रबी हंगामावर शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मोडीत काढलेल्या २० हजार हेक्टरवर पेरणी होणार असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे़ सूर्यफुलाचा पेरणीस हरकत नाही़़़रबी हंगामात गेल्या पाच दिवसापासून चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ रबी हंगामातील पिकांच्या पेरणीचा कालावधी १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०१५ हा असला तरी पाऊस चांगला झाला असल्याने सूर्यफुलाची पेरणी करता येईल, असे जिल्हा कृषी अधिक्षक प्रतापसिंह कदम यांनी सांगितले़ सप्टेंबर अखेर पावसाची नोंद़़़जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी ७२५़३ मि़मी़ तर प्रत्यक्ष पाऊस ४९़४ मि़मी़ पाऊस झाला आहे़ यामुळे आणखी पावसाचे प्रमाण वाढले तर रब्बीच्या पेरणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता कृषी विकास अधिकारी जाधव यांनी व्यक्त केली़