शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

राष्ट्रपती कोविंद यांच्या पहिल्याच भाषणावर काँग्रेसचा जोरदार आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 21:51 IST

संसदेच्या सेंट्रल हॉलमधे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ ग्रहणानंतर केलेले पहिलेच भाषण वादग्रस्त ठरले

सुरेश भटेवरा

नवी दिल्ली, दि. 26 - संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ ग्रहणानंतर केलेले पहिलेच भाषण वादग्रस्त ठरले आहे. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी महात्मा गांधींबरोबर दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाचा उल्लेख करून दोघांच्या कार्याची तुलना केली. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचा नामोल्लेख करणे कटाक्षाने टाळले. राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी त्यावर अत्यंत त्वेषाने गंभीर आक्षेप नोंदवला. सभागृहाचे नेते अर्थमंत्री जेटली आनंद शर्मांच्या आक्षेपावर प्रचंड भडकले आणि म्हणाले, सभागृहात राष्ट्रपतींच्या भाषणावर चर्चा कशी होऊ शकते, त्यावर आक्षेप नोंदवण्याचे औचित्य काय ? जेटलींच्या विधानावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाली.शपथ ग्रहण सोहळ्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना रामनाथ कोविंद म्हणाले, ‘हमें तेजीसे विकसित होनेवाली एक मजबूत अर्थव्यवस्था, एक शिक्षित, नैतिक और साझा समुदाय, समान मूल्योंवाले और समान अवसर देनेवाले समाज का निर्माण करना होगा... एक ऐसा समाज, जिसकी कल्पना महात्मा गांधी और दीनदयाल उपाध्यायजी ने की थी... ये हमारे मानवीय मूल्योंके लिए भी महत्वपूर्ण है... ये हमारे सपनों का भारत होगा... इक्किसवी सदी में ऐसाही भारत हम सब चाहते है, जो सभी को समान अवसर सुनिश्चित करेगा’।निवडक उल्लेखांचे राष्ट्रपतींचे हे भाषण म्हणजे महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंचा सरळ सरळ अपमान आहे, असा आरोप करीत आनंद शर्मा म्हणाले, महात्मा गांधींबरोबर दीनदयाल उपाध्याय यांचे नाव जोडून दोघांची तुलना घडवणे, सर्वथा आक्षेपार्ह आहे. भाषणाच्या सुरुवातीला कोविंद यांनी केवळ सरदार वल्लभभाई पटेलांचा उल्लेख केला. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचे नामोल्लेख कटाक्षाने टाळला त्याबद्दलही आनंद शर्मांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.