आर. आर. पाटील यांचे पुणेकरांशी ऋणानुबंध
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
पुणे : राष्ट्रवादीतील प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील विविध कार्यक्रमांना आर. आर. पाटील यांना निमंत्रित केले जायचे. त्यांचा भाषणाला पुण्यातील तरुणांची हमखास गर्दी व्हायची. सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना ते प्राधान्यांने उपस्थित राहत असत. मात्र, त्यावेळी हॉटेलमध्ये जेवण्याऐवजी कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा त्यांचा आग्रह असायचा, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
आर. आर. पाटील यांचे पुणेकरांशी ऋणानुबंध
पुणे : राष्ट्रवादीतील प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील विविध कार्यक्रमांना आर. आर. पाटील यांना निमंत्रित केले जायचे. त्यांचा भाषणाला पुण्यातील तरुणांची हमखास गर्दी व्हायची. सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना ते प्राधान्यांने उपस्थित राहत असत. मात्र, त्यावेळी हॉटेलमध्ये जेवण्याऐवजी कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा त्यांचा आग्रह असायचा, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अनेक मेळावे पुण्यात होत. त्यावेळी आर. आर. पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असायचे. निवडणुकीच्या काळातही त्यांचे भाषणे मतदार संघात घेण्यासाठी उमेदवारांची चढाओढ असायची. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांपासून ते हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलनाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे मार्गदर्शन न मिळाल्याची हळहळ कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली होती. पक्षातील सहकारी आमदार व पदाधिका-यांसह इतर पक्षातही त्यांचे अनेक मित्र होते. त्याविषयी पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. --------------- 'आर. आर. पाटील हे ग्रामीण भागातून आलेले अभ्यासू व समाजमान्य नेते होते. विधीमंडळातील त्यांच्या कामकाजाबद्दल त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान मिळाला होता. लोकलेखा समितीमध्ये असतानाही त्यांनी चागंले काम केले होते. विधीमंडळातील प्रत्येक प्रश्नाला ते हजरजबाबीपणे मार्मिक उत्तर देत असत. ग्रामीण भागातील जेवणांची त्यांना आवड होती. सरकारी यंत्रणेच्या सुधारणेविषयी आम्ही अनेकदा चर्चा करायचो. आमचे चांगले मित्र गेल्याचे दु:ख वाटते.'- गिरीश बापट, पालकमंत्री. --------------------'आर. आर. आबा हे विधीमंडळातील आमचे मार्गदर्शक होते. एखादे काम घेवून घेल्यानंतर ते कधीही नकार द्यायचे नाहीत. उलट अधिका-यांकडून कसे काम करून घ्यायचे याचे ते मार्गदर्शन करीत असत. तुझ्याकडे घरी जेवायला येईन. त्यावेळी मला शेतात जेवन दे. निवडणुकीनंतर मी नक्की येईन, असे ते म्हणाले होते. परंतु, त्यांच्या जाण्याने त्यांची माझ्या शेतात येवून जेवण करण्याची इच्छा अपुरी राहिली.'- बापू पठारे, माजी आमदार. --------------------