शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्जमाफी योजनेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचे प्रश्नचिन्ह

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

उदयपूर - सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनांवर प्रश्नचिन्ह उभे करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अशाप्रकारच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा प्रभावित केल्याचे म्हटले आहे. भारतीय आर्थिक संघाच्या वार्षिक संमेलनात बोलताना त्यांनी काही राज्यांमध्ये अनेक प्रसंगी कर्जमाफी दिली गेली. या माफी योजना कितपत यशस्वी झाल्या. आपल्यासमोर यासंदर्भात जे अध्ययन आले त्यात या योजना निकामी ठरल्याचेच दिसले. खरे तर या योजनांमुळेच शेतकऱ्यांना दिला जाणारा कर्ज पुरवठा खंडित झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना राजन यांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील मुद्दा असून, त्याची सखोल तपासणी केली जाण्याची गरज व्यक्त केली. कृषी क्षेत्र हे कर्जाच्या ओझ्यातून कसे मुक्त होऊ शकते, हा एक प्रश्न आहे व त्यासाठी आपल्यासमोर काय पर्याय असू शकतात, याचसोब

उदयपूर - सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनांवर प्रश्नचिन्ह उभे करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अशाप्रकारच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा प्रभावित केल्याचे म्हटले आहे. भारतीय आर्थिक संघाच्या वार्षिक संमेलनात बोलताना त्यांनी काही राज्यांमध्ये अनेक प्रसंगी कर्जमाफी दिली गेली. या माफी योजना कितपत यशस्वी झाल्या. आपल्यासमोर यासंदर्भात जे अध्ययन आले त्यात या योजना निकामी ठरल्याचेच दिसले. खरे तर या योजनांमुळेच शेतकऱ्यांना दिला जाणारा कर्ज पुरवठा खंडित झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना राजन यांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील मुद्दा असून, त्याची सखोल तपासणी केली जाण्याची गरज व्यक्त केली. कृषी क्षेत्र हे कर्जाच्या ओझ्यातून कसे मुक्त होऊ शकते, हा एक प्रश्न आहे व त्यासाठी आपल्यासमोर काय पर्याय असू शकतात, याचसोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्यावरही विचार केला गेला पाहिजे. आत्महत्यांमागे कर्जबाजारी होण्याचे कारण कितपत आहे; तसेच त्यांच्यावरील हे ओझे किती कमी झाले आहे हे तपासले पाहिजे, असे मत राजन यांनी पुढे व्यक्त केले.
आंध्र व तेलंगणाच्या सरकारांनी मागील वर्षी राज्यात आलेल्या फॅलिन चक्रीवादळापायी शेतीची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांकरिता कर्जमाफीची घोषणा केली होती.
तेलंगणाने माफ केलेल्या कर्जाचा २५ टक्के हिस्सा बँकांना दिला असून, आंध्र प्रदेशाने अद्यापही तो तसा दिलेला नाही. या दोन्ही राज्यांमध्ये कृषी क्षेत्राकरिता बँकांनी १.३ लाख कोटींचे कर्ज दिले होते.
कृषी क्षेत्राला जे अनुदान दिले जाते ते खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते अथवा नाही, हे पाहावे लागेल. कृषी क्षेत्राला कमी दरात कर्ज दिले जात आहे व सरकार कर्जमाफी देते आहे. त्यामुळे या कर्जाचा योग्य उपयोग होतो आहे का की त्याचा गैरवापर होतो आहे आणि कर्जबाजारीपणा वाढतो आहे का हेही तपासले जावे, असेही प्रतिपादन राजन यांनी पुढे केले.