शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या वाघ यशकथेवर ‘आॅक्सफर्ड’चे प्रश्नचिन्ह

By admin | Updated: February 24, 2015 23:17 IST

भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या

लंडन : भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. या गटाने चुकीची संशोधन पद्धती अवलंबल्याने भारत सरकारच्या आकडेवारीच्या विश्वसनीयतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.वाघ आणि इतर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या गणनेसाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण पद्धतीत अचूकतेच्या दृष्टीने अनेक कमतरता आहेत. यामुळे अशा सर्वेक्षणांची अचूकता संशयाच्या भोवऱ्यात सापडते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था आणि वन्यजीव संवर्धन संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या एका गटाने प्रथमच वाघांच्या गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सध्या वापरात असलेल्या ‘अंश शोधन निर्देशांक’ पद्धतीत अंगभूत कमतरता आहेत. यामुळे अचूक निष्कर्ष निघणे अडचणीचे ठरते असा दावा या गटाने केला आहे. भारतीय राष्ट्रीय वाघ सर्वेक्षण संस्थेने जानेवारी २०१५ च्या अहवालात वाघांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत ही वाढ झाली आहे. सर्वेक्षणानुसार २०१४ मध्ये २,२२६ वाघ होते. २०१० मधील वाघांच्या तुलनेत यात ३० टक्के वाढ नोंदली गेली आहे.‘आमच्या अभ्यासातून अंश शोधन निर्देशांक अर्थात इंडेक्स कॅलिब्रेशन पद्धती संशोधनासाठी कुचकामी असल्याचे दिसून येते. भारतीय वाघ सर्वेक्षण अहवालात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीचा अनुभवाधिष्ठित पद्धतीने अभ्यास केला. यात अंश शोधन पुनरुत्पादनीय आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट होते,’ असा दावा या अभ्यास गटाचे प्रमुख अर्जुन गोपालस्वामी यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)