शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

हिंसाचाराला पायबंद घाला!

By admin | Updated: May 4, 2017 03:28 IST

वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली

नवी दिल्ली : ओडिशामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्तारूढ बिजदकडून राजकीय विरोधकांविरुद्धच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. भाजपाच्या दुसऱ्या एका शिष्टमंडळाने याच हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाकडेही दाद मागितली आहे.पेट्रोलियम न नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या शिष्टमंडळाने बुधवारी नवी दिल्ली येथे राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रधान म्हणाले, ‘ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील कालीकुंडा या गावात शेळीपालन करून आपली गुजराण करणाऱ्या पार्वती सासमल या गरीब महिलेने नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाला मतदान केले म्हणून तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पार्वतीने तिच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या रोड शोदरम्यान निवेदनही सादर केले होते. पंतप्रधानांना निवेदन देऊन आपल्या कुटुंबीयांसमवेत परत येत असताना बिजदच्या गुंडांनी तिच्यावर पुन्हा भीषण हल्ला केला.’ओडिशातील सत्तारूढ बिजदतर्फे राजकीय विरोधकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होणे ही चिंतेची बाब आहे. तेथील पंचायत निवडणुकीच्या आधी आणि नंतर अशा हिंसाचारात किमान १० जण मारले गेले आहेत. राज्यात अशा प्रकारचा राजकीय हिंसाचार याआधी कधीही पाहिलेला नाही, असे प्रधान म्हणाले.सत्तारूढ बिजदचा जनाधार वेगाने ढासळतो आहे आणि त्यामुळे बिजद हिंसक बनली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यात तत्काळ हस्तक्षेप करावा आणि बिजदच्या हिंसाचाराला बळी ठरलेल्या गरीब महिला व इतरांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती प्रधान यांनी केली. भाजपाच्या या शिष्टमंडळात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संदीप पात्रा, ओडिशाचे भाजपा सरचिटणीस पृथ्वीराज हरिचंदन, प्रदेश सचिव डॉ. लेखाश्री सामंतसिंघर यांचा समावेश होता.