शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांना हृदयात स्थान द्या

By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST

संभाजी पाटील यांचे आवाहन : वीरपत्नी भावना गोस्वामी यांचा सन्मान

संभाजी पाटील यांचे आवाहन : वीरपत्नी भावना गोस्वामी यांचा सन्मान
नागपूर : सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीत देश व देशवासीयांचे संरक्षण करीत असतात. त्यांची केवळ संकटकाळात आठवण करू नका. त्यांना हृदयात स्थान द्या असे आवाहन २२ मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे सेवानिवृत्त कमांडिंग ऑफिसर कर्नल संभाजी पाटील यांनी केले.
मरणोपरांत अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित ९ पॅरा कमान्डो बटालियनचे लान्स नाईक शहीद मोहननाथ गोस्वामी यांना प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे रविवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, त्यांच्या पत्नी भावना यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कर्नल पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थानी तर, संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त कर्नल सुनील देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
शहीद गोस्वामी यांचा पराक्रम कधीच विसरता येणार नाही. सैनिक केवळ देशाच्या रक्षणासाठी लढत असतो. सैनिकांप्रमाणे नागरिकांनीही देशसेवेचा विचार केला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी सर्व प्रकारचे भेदभाव विसरून चांगली व्यक्ती होणे आवश्यक आहे. केवळ ट्रकच्या मागे मेरा भारत महान लिहिल्याने काहीच होणार नाही. देशप्रेम मनात जागवले पाहिजे. शिस्त विकासाचा पाया आहे. शिस्त पाळणारा देशच विकास करू शकतो असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी युद्धाच्या आठवणीही सांगितल्या.
बलिदान जीवनाचे सत्य आहे. देशासाठी सर्वस्व समर्पित करणे आपली परंपरा आहे. अशी व्यक्ती पूज्यनिय असते असे तिवारी यांनी सांगितले. तसेच, त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर खंत व्यक्त केली. आज आपण विशिष्ट प्रसंगीच सैनिकांची आठवण काढतो. अभ्यासक्रमातून सैनिकांच्या पराक्रमाचे धडे काढून टाकण्यात आले आहेत. देशाचा संपूर्ण इतिहास शहिदांनी भरलेला आहे. परंतु, कोणालाही शहिदांची नावे माहिती नाहीत. देशाचा विकास तरुणांवर अवलंबून आहे. विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारा धर्म व जातीभेद तरुणांनी नष्ट करावा. तसे झाल्यास देशाच्या अखंडतेला काहीच धोका राहणार नाही असे ते म्हणाले.
----------------
भावना गोस्वामी भावुक झाल्या
सन्मानाला उत्तर देताना भावना गोस्वामी भावुक झाल्या होत्या. यामुळे कार्यक्रमात उपस्थित अनेकांचा कंठ दाटून आला. भावना यांनी पतीवर गर्व वाटत असल्याचे व त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे मनोगत व्यक्त केले. तसेच, पतीचा सन्मान केल्यामुळे आभार मानले.