शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’ला धक्का; भाजपाचा इरादा पक्का

By admin | Updated: August 30, 2014 02:36 IST

मातोश्रीवर जाऊन मनधरणी करण्याचा अडवाणी व मुंडे यांनी पाडलेला प्रघात आता मोडीत काढण्याचा इरादा राजधानीतील भाजपा नेत्यांनी पक्का केला आहे

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमातोश्रीवर जाऊन मनधरणी करण्याचा अडवाणी व मुंडे यांनी पाडलेला प्रघात आता मोडीत काढण्याचा इरादा राजधानीतील भाजपा नेत्यांनी पक्का केला आहे. वाटाघाटीत सुटणाऱ्या अधिकाधिक जागा जिंका आणि मुख्यमंत्रिपद ताब्यात घेऊन शिवसेनेला उत्तर द्या, असा स्पष्ट कानमंत्रही नेत्यांना दिला गेला आहे. हरियाणामध्ये हरियाणा जनहित काँग्रेसने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रादेशिक पक्षांबाबत वागताना थोडीशी कठोर भूमिका घेण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे हे या निवडणुकीतील उमेदवार व ते कोअर समितीचे सदस्यही असल्याने त्यांचा शिवसेनेशी फार संबंध न ठेवता राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी शिवसेनेचा संपर्क ठेवण्याचेही नियोजन होत आहे. जागावाटपाआधी त्याला अंतिम रूप येईल. याच पायरीतील एक टप्पा म्हणजे, माजी अध्यक्ष राजनाथसिंग व त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू असलेले राजीव प्रताप रूडी हे राज्याचे प्रभारी असताना त्यांचे पंख छाटत अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या मर्जीतील राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश माथुर यांना राज्याचे निवडणूक प्रभारी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास असलेले राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांना निवडणूक संपेपर्यंत राज्यात मुक्कामी ठेवून भाजपाने नवी खेळी खेळली आहे. सूत्रांनी असे सांगितले, की रूडी यांना बदलण्याची शक्यता असून, त्यासाठी मुहूर्त व घटना शोधण्याचे काम सुरू आहे. व्ही. सतीश मूळचे नागपूरचे, सध्याचे प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारीही नागपूरकर, असे चित्र वरवर दिसत असले तरी त्यांची मुळे खोलवर रूतल्याचे जाणकारांचे मत आहे.बिहार, उत्तराखंड, कर्नाटकातील पोटनिवडणुकींच्या निकालानंतर व त्यापाठोपाठच्या हरियाणाप्रकरणानंतर शिवसेनेने भाजपाशी असलेला व्यवहार अधिक ताठर केला असला तरी, त्याचे कोणतेच पडसाद दिल्लीत उमटलेले नाहीत.