शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेला धक्का

By admin | Updated: January 15, 2017 00:59 IST

नोटाबंदीनंतरच्या घटनाक्रमांमुळे अपमान सहन करावा लागत आहे आणि प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे, अशा स्पष्ट शब्दांत रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली तीव्र

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतरच्या घटनाक्रमांमुळे अपमान सहन करावा लागत आहे आणि प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे, अशा स्पष्ट शब्दांत रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याकडे व्यक्त केली आहे. केंद्र सरकारचे निर्णय हे रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता, वैधानिक व व्यवहाराच्या कार्यकक्षेतील कामांत हस्तक्षेप करणारे असल्याचे पत्रच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी उर्जित पटेल यांना पाठविले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेच्या दैनंदिन कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याबद्दल आयबीआय कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या कारभारात आवश्यकतेपेक्षा होणारा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा हस्तक्षेप अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अपमानास्पद असून तो तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्तताचे रक्षण करण्यासाठी आपण पावले उचलावीत, असे आवाहनही गव्हर्नर उर्जित पटेल यांना केले आहे. रिझर्व्ह बँकेतील चलन साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची ची नेमणूक होणार असल्याची चर्चा आहे. त्याला आक्षेप घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारभारातील हस्तक्षेप बंद व्हावा, असे म्हटले आहे. अनेक दशकांपासून रिझर्व्ह बँकेची कार्यक्षमता, स्वायत्तता आणि स्वतंत्र कारभाराची ओळख त्यांच्या मेहनती कर्मचारी वर्गामुळे कायम आहे. मात्र संयुक्त सचिवाच्या नियुक्तीमुळे कार्यक्षमता व स्वायत्तता यावर परिणाम होईल, असा इशारा या पत्रात द्वारे देण्यात आला आहे. या पत्रावर आॅल इंडिया रिझर्व्ह बँक कर्मचारी असोसिएशनचे समीर घोष, आॅल इंडिया रिझर्व्ह बँक वर्कर्स फेडरेशनचे सूर्यकांत महाडिक, आॅल इंडिया रिझर्व्ह बँक आॅफिसर्स असोसिएशनचे सी. एम. पॉलसिस आणि आरबीआय आॅफिसर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याही सह्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)