शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या १६ गिर्यारोहकांची सुटका

By admin | Updated: April 28, 2015 23:58 IST

भारतीय हवाईदलाने माऊंट एव्हरेस्ट भागात अडकून पडलेल्या पुणे (महाराष्ट्र) येथील १६ गिर्यारोहकांची मंगळवारी सुटका केली.

काठमांडू : भारतीय हवाईदलाने माऊंट एव्हरेस्ट भागात अडकून पडलेल्या पुणे (महाराष्ट्र) येथील १६ गिर्यारोहकांची मंगळवारी सुटका केली. यात ११ वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. हा चमू लुकला येथून माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला जात होता; मात्र भूकंप आणि त्यानंतरच्या हिमस्खलनामुळे हे गिरीप्रेमी अर्ध्या वाटेतच अडकून पडले होते. पुढे जाता येत नव्हते, तसेच मार्ग खचल्यामुळे मागेही फिरता येत नव्हते. अशा स्थितीत या चमूने नेपाळी लष्कराच्या मैदानावर तंबू ठोकून कसेतरी दोन दिवस काढले. त्यानंतर हा चमू हेलिकॉप्टरने लुकला येथे दाखल झाला आणि तेथून भारतीय हवाईदलाच्या विमानाने त्यांना मायदेशी आणले. सह्याद्री पर्वतराजीत गिरीभ्रमणाचा आम्हाला अनुभव आहे; मात्र यावेळी प्रथमच आम्ही हिमालयात गिर्यारोहण करण्याचा निर्णय घेतला, असे गिर्यारोहणाची ही मोहीम हाती घेणारे राकेश निभजाया यांनी सांगितले. या चमूसोबत श्रावणी कुलकर्णी ही सातवीची विद्यार्थिनी होती. ११ वर्षांच्या श्रावणीने गिर्यारोहणाचा हा पहिला अनुभव आनंददायी होता, असे सांगितले. (वृत्तसंस्था)काठमांडू : भूकंपानंतर ५० तासांपासून ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या नेपाळी महिलेला भारतीय बचाव कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. सुनीता सितौला असे या सुदैवी महिलेचे नाव आहे. येथील बसुंधरा भागातील ५ मजली इमारत कोसळल्यानंतर सुनीता या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. सुनीता इमारतीच्या दोन स्लॅबमधील रिकाम्या पोकळीत सुरक्षित होती. सुटकेनंतर तिला नजीकच्या रुग्णालयात व प्रथमोपचारानंतर स्थानिक शाळेतील शिबिरात हलविले.हलविण्यात आले. सुटका झाल्यानंतर आपण वेगळ्या जगात आलो आहोत, असे आपणास वाटत असल्याची प्रतिक्रिया सुनीताने व्यक्त केली. सुनीताचा पती व दोन मुले भूकंपाच्या तडाख्यात सापडली नव्हती.